पान:सौंदर्यरस.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१११
 

 आता 'महापुरुष' (श्री. के. देवधर, 'विवेक' दिवाळी १९७१) आणि 'कडेलोट' (श्री. के. देवधर, 'विवेक' दिवाळी १९६९) या दोन कथा पहा. 'महापुरुष' ही बाजीराव-मस्तानी यांच्या जीवनावरची कथा आहे छत्रसालाने बाजीरावाला मस्तानी अर्पण केली, तिच्या मुलाची मुंज करण्याचा बाजीरावाचा विचार होता, पुण्याच्या ब्राह्मणांनी त्याला विरोध केला आणि मस्तानी शनिवारवाडयात रहावयास आली तर रघुनाथरावाची मुंज करण्यास ब्राह्मण मिळणार नाही, अशी धमकी दिली. शेवटी बाजीराव साहेब स्वारीवर गेले असताना चिमाजी अप्पांनी मस्तानीला कैद केले इत्यादी इतिहासात वर्णिलेल्या प्रसंगांचे वर्णन 'महापुरुष' या कथेत आहे. व्यक्ती इतिहासप्रसिद्ध आणि त्यांचे जीवनही सार्वजनिक, कल्पित, नवनिर्मित असे त्यात काही नाही. प्रसिद्ध पुरुषांचे वैयक्तिक, प्रापंचिक जीवन रंगविले तरी त्यातून काही रसनिर्मिती होऊ शकते. या कथेत तेही नाही. त्यामुळे इसिहासात अनेक वेळा सांगितलेली हकीकत, यापलीकडे या रचनेला दुसरे रूप येऊ शकले नाही.
 'कडेलोट' ही दुसरी कथा साधारण याच प्रकारची आहे. शहाजादा अकबर हा बापावर उलटून संभाजीराजांच्याकडे आला त्या वेळची ही कथा आहे. अकबर औरंगजेबाविरुद्ध उठला कसा, त्याला रजपुतांनी साह्य कसे केले, औरंगजेबाने त्या सर्वांना नुसत्या एका पत्राने फसविले कसे, मग दुर्गादासाच्याबरोबर तो दक्षिणेत आला कसा, या इतिहासात घडलेल्या घटनांचेच वर्णन शहाजाद्याच्या आठवणीच्या रूपाने प्रथम बरेच दिले आहे. त्याच्या दिमतीला रामप्यारी नावाची एक दासी संभाजी राजांनी दिली होती, तिच्यावर त्याचे प्रेम जडले होते. त्यांच्यांतील शृंगारप्रसंगांचे काही वर्णन हा यांतील वैयक्तिक जीवनाचा भाग. एक तर तो फार थोडा आणि इतिहासाचे धागेदोरे त्यातून मुळीच दिसत नाहीत. अकबराने रामप्यारीला इस्लामची दीक्षा दिली आणि संभाजीराजांनी त्यांना भेट म्हणून दिलेला कंठा तिच्या गळ्यात घातला. याचा संभाजीराजांना राग आला. राजांच्या आश्रयाला आल्यावरही अकबर स्वतःला शहेनशहाच समजत होता आणि आपले कोण काय करणार, अशी त्याला घमेंड होती. पण राजांकडून कविकलश आले आणि त्यांनी त्याला वरील कृत्याबद्दल खरमरीत समज