पान:सौंदर्यरस.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१०९
 

आभास निर्माण करतात. शिवाय तात, देवदर्शन करून भोजनासाठी चलावं, गाओ, खुशीसे गाओ ! आदाब अर्ज, हिरेजडित किमाँष, आपकी शरण मे आए है, खूबसूरत शहाजादी, महाराजांनी याद केली आहे, नाचीज प्राणाचा बचाव करण्यापेक्षा गनिमाशी मुकाबला करा, देवगिरीची हिफाजत निर्भर आहे, आम्ही मजबूर आहो, अजीब प्रसंग, असल्या भाषेने तो काळ जिवंत होतो.
 जेठाईचे आत्मबलिदान हे येथे कथासूत्र आहे. वर सांगितलेच आह की बहुतेक इतिहासकार तिचा उल्लेखही करीत नाहीत. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या भारतीय विद्याभवनाने प्रसिद्ध केलेल्या इतिहासात, 'दिल्ली सलतनत' या खंडात, अल्लाउद्दिनाने तशी अट तहात घातल्यामुळे रामदेवरावाला कन्या त्याला देणे भाग पडले, एवढा फक्त उल्लेख आहे. अशा या जेठाईच्या त्या प्रसंगीच्या भावभावनांतून लेखिकेने त्या सर्व इतिहासाचे कल्पनेने दर्शन घडविले आहे. यामुळे ही ऐतिहासिक लघुकथा रम्य झाली आहे.
 'प्रीतीची रीत अशी' ही मृणालिनी देसाई यांची कथा अशीच व याच कारणासाठी रम्य झाली आहे. औरंगजेबाची कन्या शाहाजादी रोशन आरा हिचे मन छत्रपती संभाजी यांच्यावर जडले होते. हे प्रेम कधीच सफल झाले नाही, होणे नाही, होणे शक्यच नव्हते. यामुळे तिच्या मनाचा झालेला गुदमरा, तिच्या अंतरातले दुःखाचे कढ, तिच्या मनातली निराशा, वैफल्य, घराण्यात जन्माला येणान्या कन्यांचे दुर्दैव, यांची ही कथा आहे. रोशनआरा मोगल आणि तिची आत्या- औरंगजेबाची बहीण- जहानआरा या ऐतिहासिक व्यक्ती आहेत. पण इतिहास त्यांचा फक्त निर्देश करतो. आणि तो प्रामुख्याने याच कारणासाठी करतो. एकीचे मन- जहानआराचे- शिवछत्रपतींच्यावर जडले होते, दुसरीचे शंभूछत्रपतीच्यावर 'प्रीतीची रीत अशी' ही कथा रोशन आराच्या विफल प्रेमाची आहे. तिच्या मनात उसळणाऱ्या वेदनांच्या सागराची आहे.
 शंभुराजांना मुसक्या बांधून दरबारात आणले तेव्हा पडद्यातील झरोक्यातून ती त्यांच्याकडे एकटक पहात होती, त्याच क्षणी त्यांनी पण वर पाहिले. नजरानजर झाली आणि प्रीतीच्या रीतीप्रमाणे, प्रीती जन्माला आली. आणि पुढे तर शंभुराजांनी शहाजादीला मागणीच घातली. आणि