पान:सौंदर्यरस.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१०५
 

 याउलट 'अबला नव्हे, सबला' (भालचंद्र देशपांडे, 'वसंत', फेब्रुवारी १९७५) आणि 'वीरमाता कर्मवती' (सौ. ऋता, 'धर्मभास्कर', दिवाळी १९७२) या दोन कथा पहा. अन्हिलवाडचा राजा अजयदेव अकाली मृत्यू पावला. त्याची राणी नाईकीदेवी ही त्याच्या मागून राजप्रतिनिधी म्हणून कारभार पाहू लागली. त्याच वेळी महंमद घोरी याच्या भारतावर स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या एका स्वारीत घोरीचा मोर्चा अन्हिलवाडकडे वळला. हे फारच मोठे संकट होते. अन्हिलवाडचा प्रधानमंत्री राजचित्त, सेनापती कुमारदेव सगळे घाबरून गेले व शरणागतीचा सल्ला देऊ लागले. पण राणी नाईकीदेवी हिने तो मानला नाही. आणि प्रतिकार करण्याचा निश्चय केला. तिने सैन्यभरतीची आज्ञा दिली आणि त्या नवशिक्या तरुण शिपायांसह पुढे होऊन तिने गदरघाटातील खिंडीत महंमद घोरीच्या सैन्याला गाठले आणि त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा करून सैन्यासकट घोरीला पळवून लावले.- अशी 'अबला नव्हे, सबला' ही कथा आहे. ही कथा म्हणजे एक हकीकत आहे. केवळ घटनेचे कथन आहे, निवेदन आहे. राणी, सेनापती, प्रधानमंत्री या राष्ट्रीय व्यक्तींची ही कथा आहे आणि ती त्यांच्या सार्वजनिक कार्याची आहे. प्रापंचिक सुखदुःखाची नाही. ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्याची रूपरेषा इतिहासात येऊन गेलेली असते; त्यामुळे असल्या हकीकती ही नवनिर्मिती होत नाही. कथेला लालित्य यावयाचे तर तिची उभारणी कल्पिताच्या पायावर झाली पाहिजे. तशी येथे झालेली नाही. मूळ घटनेत थोडासा तपशील लेखकाने कल्पनेने भरला, इतकेच.

 'वीरमाता कर्मवती' ही कथा म्हणजे अशीच एक हकीकत आहे. मेवाडवर अकबराने स्वारी केली होती. राणा उदयसिंहाच्या मदतीला अनेक रजपूत सरदार रणात उतरले होते. केळवाडचा प्रशासक, राणी कर्मवतीचा पुत्त नावाचा मुलगा हा केवळ सोळा वर्षांचा असल्यामुळे उदयसिंहाने त्याला पाचारण केले नव्हते. तरीही कर्मवतीने त्याला आग्रहाने, बरोबर सैन्य देऊन पाठविले होते. अकबराच्या सैन्याशी पुत्त लढत होता. याच वेळी त्याच्या पिछाडीवरून हल्ला करण्यासाठी अकबर सैन्य घेऊन एका खिंडीतून येत होता. ही बातमी कर्मवतीला कळताच कन्या कर्णवती व सून कमलावती