लिहूं या रक्त शाइनें की । मायभू-भाल प्रदेशांकी ।
नाहिंगे स्वतंत्रता आई । जोंवरी असे देश द्रोही ॥ ९ ॥
विजेचा फॅन आरामाला । तयाला मधुर भोजनाला ।
खातसूं फटके निज देही । घळाळे रक्त-मांस त्यांहीं ॥ १० ॥
पाहती मांस लोंबलेलें । चामडे रक्तस्त्राव चाले ।
निंदुनी मरा पुरे वदती । हसूनी कौन्सिलांत शिरती ॥ ११ ॥
यापरी पेशवाइ डुबली । जधी त्या सौख्य हाव भरली ।
राष्ट्र हे बुडेल विश्वासे । जन्मती मर्द जिथें ऐसें ॥ १२ ॥
तयांचा इंग्रज वालि भला । देत जो फटके आपणाला ।
आपला परमेश्वर वाली । धाव घेईल योग्य कालीं ॥ १३ ॥
किती मंगल ही वेला तुम्हाला । पातलीच समराला । हरहर जय
बोला ॥ धृ० ॥ .
मुळशि वाचवा । आज शौर्य गाजवा । प्रथम तेथ विजयि व्हा ।
झणी लायक ठरला । स्वराज्याला ॥१॥
सदन पेटलें । प्रथम विझवा अपुलें । त्यजुनि कार्य हे भलें । कसे
भाळला खुळे । फोन्सिलाला ॥२॥
खचित गमतसें । असें एकच सरसें । युद्ध सत्याग्रहसे | शत्रु
जिंकण्या तसे । परकियाला ॥ ६ ॥
दुफळि मोडुनी । सुजन कुजन वळवुनी । चला सकल धावुनी ।
देउ टाटा हकुनी । करुनि हल्ला ॥ ४ ॥
महाराष्ट्रिचा महाप्रतापी महा पुरुष मी तो