कलम बहाद्दर नसे असा जयघोष करी जो तो ॥ धृ० ॥ स्वर्गी गेला महाराष्ट्रिचा अनभिषिक्त राजा । पवित्र गादी पात्र तिला मी गौरव हो माझा ॥ दंड ठोकुनी मज जिंकाया गांधी सरसरला । फजित पावला भोट अजागळ तुरुंगांत दडला || दास नेहरू अल्ली बंधू अजाणती बाळें । आले गेले त्याच गतीला लाल नील सगळे || चालः– प्रतियोगी पुण्य नगरांत | कर्नाटक पंजायत । चळवळ ती प्रांतोप्रांत || जसे गवसले पुढें ठाकड़े उच्चनीच लोक । मुळशच्या सत्रांत लोटले अचूक एकेक ॥ १ ॥ मुळशी कार्यों मीच पुढारी लटके भासविले । इच्छा नव्हती मनांत होते हेतु वेगळाले ॥ कल्पनेपरी भेट येउनि गोरा अधिकारी । उपदेशीले कार्य विमुखहो गौरविले भारी || विद्वत्ता चतुरता योग्यता अशी दिवाणास-1 साजे, मुळशी पाथि वेचिशी घेशी गळफास || चाल: - तोंडास पाणि घळघळले । जिभलीने चाटित गिळिले | वच परिसुनि मन गुदगुदलें । स्वार्थासाठी तत्व सोडिले उलट पलट केली । लेखन शैली बाणा बकिली जनता भुलविली ॥ २ ॥ हकीम पंडित जे गुण मंडित दास नेहरूसे | र खासे भुलले एका फटकान्या सरसे । गूढ कळेना खळबळ झाली जम-मत गोंधळलें । नांव निशी आवाज गाजला गगन भुवन भरलें । कोणी म्हणती देशद्रोही राष्ट्रघातकाही । स्वार्थ परायण करील भलती कृती अमंगळही ॥ ३ ॥
पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/९
Appearance