Jump to content

पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)


पद ६ वें.
चाल- "सुखदा सुभास झाला"

दुनिया झुकेल झोला । चाहिये झुकानेवाला ॥ ध्रु० ॥
आठवा शिवाजि बाजी तान्हा हिरा हिरोजी ।
केला रणांत दुल्ला जितला स्वराज्य किल्ला ॥ १ ॥
वीरा भाउरावा राघो भरारि आठवा ।
चिरिला गळा रिपूचा झाला अजिंक्य साचा ॥ २ ॥




पद ७ वें.
चाल - "हमारा देशप्यारा है हमारा रामप्यारा है".

मुळशिला चला एकदां की, । मेळवा मोक्ष याच लोकीं ॥ धृ० ॥
धन्य तो युद्ध समाप्तीचा । पातला काल सुभाग्याचा ।
उठावें वृद्ध तरुण भगिनी । जयाचें हिंद ब्रीद त्यांनी ॥ १ ॥
वहाते दिव्य पुण्यगंगा । तों-वरी स्नान करा भागा ।
लुप्त ती राम-जन्म दिवशीं । असे होणार निश्चयेसी ॥ २ ॥
कोन्सिले सौख्य वैभवाची । नको ती राष्ट्रघातक्यांची ।
लालसा गर्व - माद जेथें । कशाचें देश-कार्य तेथें ॥ ३ ॥
मजेचा महाल रंगेला । मिळू द्या तया राहण्याला ।
आपला हॉल कैदखाना । मोक्षदा रम्य भव्य माना ॥ ४ ॥
तयांना उशा मऊ गिरद्या । बसाया कोच उंच गाद्या ।
फाटक्या काथ्याची रकटीं । आपलें देह रक्त चाटी ॥ ५ ॥
तेथचा थाट मनोहारी । नको ते भाष्य हास्यकारी ।
आपले ध्येय अन्य छंदीं । वागणें नित्य भाष्य बंदी ॥ ६ ॥
पगडिचा झोक नोक त्यांना । झिरमिळ्या हलत डोलतांना ।
आपल्या कानेळे डोई । दाविते विभव सांप्रदायी ॥ ७ ॥
लाविला गंध होल्डराला । टाक तो तयां लेखनाला ।
हातोडी खडी फोडिताही । रक्त ये, ती आपणा शाई ॥ ८ ॥