बहु कठिण समय उगवेला । ये वेगे धावुनी ॥ तू० ॥
वा काय करावें बोल । जें गुह्य खोल चिनमोल
तो पंथ दाखवी आम्हा । रिपु आणूं बांधुनी ॥ तूं० ॥
हा काय खेळ करिसी । सांग यदुराया ॥ धृ ॥
भारत हितरत प्रिय बाळासी । निज दरबारी ओढुनि नेसी ।
लुली पांगळी जनता करिसी । भो सदया ! सांग यदुराया ॥१॥
कारागारी तुवां लोटिलें । गांधीजींना हतबल केलें ॥
अंधःकारें त्रिभुवन भरलं । भो सदया ॥ २ ॥
बुद्धी विपरित हो प्रमुखांन । पंथ विनाशक सुचती त्यांना ।
मानपान सुखध्यास जयांना । भो सदया |॥ ३ ॥
भूमातेचीं सारी बाळें । पथ आक्रमिती वेगवेगळे ।
एकी नाही नाश पावले । भो सदया ॥ ४ ॥
परस्परांतच वाद माजला । शत्रु जिंकणे प्रश्न निमाला ।
काय म्हणावें मूढपणाला । भो सदया ॥ ५ ॥
स्वराज्य कट्टर मवाळ दुर्बळ । पक्ष माजले अनंत ओंगळ ।
उलट लोंबती कुणिं वटवाघुळ । भो सदया । ६ ॥
म्हणुनि हिंदभू धायी रडते । हंबरतें कुणि वालि न तीते ।
लाज तियेची राखायातें । भो सदया ॥ ८ ॥
विलाप सतिचा केविलवाणा । कर्ण पथी तव अजुनि येइना ।
अंत पाहसी कां भगवाना । भो सदया ॥ ९ ॥
सीमा नुरली रिपु छळनासी । फास लागले कासावीसी ।
मान तुटे जरि धांव न घेसी । भो सदया ॥ १९ ॥