Jump to content

पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणपतीच्या मेळ्याची पद्ये,

पद १ ले

चाल– 'परमार्थाचा हा पंथ बीकट.'
मधु मंगल धामा । सौख्य विश्रामा । पुरुषोत्तमा ॥ धृ० ॥
चरणि शरण करुणागारा |
गणनाथ भव– भयहारा ।
सदया, सुखदा, शुभकारा ।
सत्पथ दावा । सत्कृति करवा
दिव्यशी । मति द्या अशी । सरशी तशी ॥ १ ॥
दुर्गम संकट काल उदेला । अंधार जगत भरला
   हतबल, जितखल, जन झाला
तुजविण वाली । या xxकाली ।
ना कुणी । ये बा झणीं । प्रभु धावुनी ॥ २ ॥


पद २ रें.

चाल – "मशि बोलु नको गोविंदा"
तूं रिपु-भय-हरिणि भवानी । कां निजली पावनी ॥
बहु शिणलों अळचुनी । कीं थकलों विनवुनी ॥ धृ ॥
कां पात्र नसूं वर द्याया । तव कृपाच संपादाया
हा छल करवीसी म्हणोनि । कां देवी गुणखनी ॥ तूं० ॥
तूं माय आमची नागे । खल करवी छल मग कां गे
तलवार स्वतां उचलोनी । करि शकले याहुनी ॥ तू० ॥
अपराध भयंकर झाले । घे पोटी सकल दयाळे