पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिच क्रिया उजव्या हातावर करा. ही क्रिया उजव्या हातावर करा. ही क्रिया साधारणपणे एक-दीड मिनिटे करा. तळहातावर एकत्र झालेली ऊर्जा चेहऱ्यावर हात ठेवून शरीरात पुन्हा संक्रमित करा. लक्षात ठेवा. - करन्यास करतांना तळहाताचे महत्व आपण बघितले आहे. आहेत. तळ हातावर सर्व दाबबिंदू आहेत. हे सर्व दाब बिंदू पायांच्या तळव्यावरही शरीरातील सर्व अवयवांच्या शीरा हात आणि पायापर्यंत पसरलेल्या आहेत. सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायूपेशी कार्यरत करावयाच्या आहेत. त्याची ही सुरुवात आहे. आंघोळ झाल्यवर सर्व स्नायूपेशी जाग्या झालेल्या आहेत. आता त्यांना जोमाने काम करण्यासाठी सूचना द्यायची आहे. पार्श्वभागाचे (गुदद्वार) स्नायूंना टाळ्यांची कंपने स्वीकारण्यासाठी ताणरहित ठेवणे महत्वाचे आहे. सूर्यनमस्कार घालतांना पार्श्वभाग (मूलाधार चक्र) मोकळा ठेवणे महत्वाचे. त्याची सवय पहिल्या प्रकारापासून करावयाची आहे. दीर्घ श्वसन प्राणतत्त्व वायुमध्ये आहे. वायू म्हणजेच मरुत, मारुती, मरुतगण, रुद्र, महारुद्र, रुद्रगण इत्यादी. ही सर्व शक्ती- सामर्थ्य यांची प्रतिके आहेत. वायूची शक्ती अगाध आहे, अफाट आहे, अनंत आहे. ही सर्व विशेषणे मानसिक सामर्थ्य व शारीरिक क्षमता यांचा निर्देश करतात. प्रत्येक प्रकारचा प्राणायाम किती वेळा करावा याची सूचना प्राणायाम कृतीमध्ये दिलेली आहे. प्राणायाम शिकण्याची ही सुरुवात आहे. यामध्ये कौशल्य • प्राप्त झाल्यावर आपली क्षमता लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यास हरकत नाही. रोगउपचार किंवा मेद कमी करण्यासाठी याचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी मार्गदर्शन घ्यावे. स्वत:वर प्रयोग करू नये. वायू ॐ - (पूरक) सराव करण्यासाठी सूचना पूर्व दिशेकडे तोंड करून आसनावर बसा. सूर्यनमस्कार एक साधना ६३