पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टाळी वाजवितांना पार्श्वभाग ताणरहित आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येकवेळी तोंडाने हुंकार द्या. तोंड बंद ठेवा. हाताच्या बोटांवरील दाबबिंदू मनगट आता फक्त बोटांचा उपयोग करून जोरदार टाळी वाजवा नमस्कार स्थितीमध्ये हात ठेवा. हातांची बोटे पक्के दाबून धरा. हाताचा तळवा, एकमेकांपासून शक्य तेवढा दूर करा. अंगठे एकमेकांपासून दूर ठेवा. श्वास घ्या. लागोपाठ आठ-दहा टाळ्या वेगाने जोरात वाजवा थांबा. पुन्हा श्वास घेऊन आठ-दहा टाळ्या बोटाने लागोपाठ वाजवा. टाळी वाजवितांना पार्श्वभाग ताणरहित राहण्यासाठी प्रत्येक टाळी- आवर्तनाचा क्रमांक (१, २, ३....) दीर्घ उच्चाराने करा. आठ-दहा टाळ्यांचे आवर्तन संपेपर्यंत तो चालू ठेवा. ● टाळ्यांचे आवर्तन ५ / ७/९ / ११ / १२ + ०१ वेळा करा. ही क्रिया साधारणपणे एक-दीड मिनिटे करा. डोळ्यांच्या पापण्या बंद करा. मधल्या बोटाने तीन वेळ पापण्यांवर, काजळ घातल्यासारखे फिरवा. हाताचा तळवा गालावर ठेवा. बोटे कपाळावर ठेवा. चेहऱ्यावर थोडा दाब दिल्यासारखे करा. डोळे दाबले जाणार नाहीत याकडे ली द्या. तळहातावर एकत्र झालेली ऊर्जा शरीरात पुन्हा संक्रमित करा. तळहातावरील दाबबिंदू डावा हात पूर्णपणे उघडा. चारी बोटे खालच्या दिशेने वाकवा. उजव्या हाताच्या बोटांची टोके व आंगठा एकत्र पकड़ा. या पाच बोटांच्या चिमट्याने उजव्या हाताच्या तळव्यावर ठोकायला सुरुवात करा. श्वास घ्या. लागोपाठ आठ-दहा कसदार ठोके मारा थांबा. पुन्हा श्वास घ्या ठोके मारा. हातावर ठोके मारतांना पार्श्वभाग ताणरहित राहाण्यासाठी प्रत्येक टाळी आवर्तनाचा क्रमांक (१, १, ११, १, १, १, १, ..) दीर्घ उच्चाराने करा. आठ-दहा टाळ्यांचे आवर्तन संपेपर्यंत तो चालू ठेवा. हे ठोक्यांचे आवर्तन ५ / ७ / ९ / ११ / १२ + ०१ वेळा. सूर्यनमस्कार एक साधना ६२