पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन्ही हातांचे मनगट गुडघ्यावर ठेवा. अंगठा - तर्जनीचे टोक एकत्र पकड़ा. सरळ ताठ बसा. आरामात बसा. शांत संगीताचे हळूवार स्वर असलेली कॅसेट किंवा मंत्रजपाची कॅसेट आवश्य लावा. प्रात्यक्षिक सूचना श्वसन करतांना संपूर्ण लक्ष श्वसन मार्ग व फुफ्फुसे (नाक व छाती) याकडे ठेवा. मान सरळ ठेवा. खोल दीर्घ श्वास आवाज न करता सावकाश घ्या. - आपल्या छातीच्या क्षमतेप्रमाणे श्वास तीन, पाच, सहा किंवा सात टप्प्यामध्ये भरून घ्या. श्वास घेतांना ॐ ०१, ॐ ०२, ॐ ०३, ॐ ०४, मनामध्ये मोजा. श्वासाची मात्रा इंद्रधनुष्याच्या कमानी सारखी छातीच्या भात्यामध्ये हळूवारपणे चढती ठेवा. (श्वास मध्ये थांबविणे, धक्का देणे टाळा.) आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास घेतल्यावर तो छातीमध्ये पकडून ठेवा. पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष ठेवा. पोटाचे स्नायू वर उचला. (शेवटच्या दोन बरगड्यांकडे लक्ष द्या.) थांबा. श्वास सोडून द्या. आवश्यक असल्यास नाक व तोंड यांचा वापर करा. या संपूर्ण क्रियेला पूरक म्हणतात. श्वास घेतांना छाती फुगते. शरीर आपोआप आतल्या आत थोडे वर उचलले जाते. मान सरळ ठेवण्याचा मात्र प्रयत्न करावयास हवा. वायू ॐ - रेचक करण्यासाठी सूचना - - श्वास नलिकेची झडप बंद करा. अन्ननलिकेतून श्वास सोडण्यास सुरुवात करा. श्वास सावकाश सोडा. घाई करू नका. श्वास नाकाने सोडा. तोंड बंद ठेवा. श्वास सोडतांना त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. श्वास सोडतांना तो शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. शेवटी ओटीपोटाकडे लक्ष देऊन तेथील श्वास बाहेर काढा. या संपूर्ण क्रियेला रेचक म्हणतात. पूरक व रेचक या दोन्ही क्रिया एकदा करून बघू. सूर्यनमस्कार एक साधना ६४