पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लय पकडतांना, अत्यानंद झाल्यावर टाळ्या वाजवतो. हातांचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही. हातांवरील सर्व दाबबिंदूंना कार्यरत करण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात करू. चष्मा, कॉन्ट्याक्ट लेन्स, श्रवण यंत्र, पायातील मोजे काढून ठेवा. पूर्व दिशेकडे तोंड करून आसनावर आरामात उभे रहा. डोक्यावरून हात फिरवा. हाताला लागलेले तेल सर्व पंजावर पसरविण्यासाठी हात चोळा. डावा हात स्थिर ठेवा. उजव्या हाताने त्यावर तीन वेळा जोराने टाळी वाजवा. टाळी वाजविताना पार्श्वभाग ताणरहित राहण्यासाठी प्रत्येक वेळी तोंडाने हुंकार द्या. तोंड बंद ठेवा. आता उजवा हात स्थिर ठेवा. डाव्या हाताने त्यावर तीन वेळा जोराने टाळी वाजवा. शरीरातील सर्व स्नायू पेशी कार्यप्रवृत्त होण्यासाठी दिलेली ही पूर्व सूचना आहे. हात खाली सोडा. हाताचे पंजे कमरेच्या रेषेत उचला. एकमेकांपासून दूर धरा. ते ढिले सोडा. दोन्ही हात अधमंडलात फिरवून छातीजवळ जोरात टाळी वाजवा. पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. साधारणपणे ३०-३२ वेळा टाळी वाजवा. हात खाली सोडा. दोन्ही हात छातीच्या रेषेत उचला. हातामध्ये जास्त अंतर ठेवा. दोन्ही हात उर्ध्वमंडलात फिरवून छाती जवळ जोरात टाळी वाजवा पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. साधारणपणे ३०-३२ वेळा जोरात टाळी वाजवा. हात खाली सोडा. दोन्ही हात छातीच्या रेषेत उचलून त्यामध्ये खांद्याचे अंतर ठेवा. दोन्ही हात वेगाने जवळ घेऊन जोमदारपणे एकमेकांवर आपटा. पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. १५ टाळ्या झाल्यानंतर हळू हळू टाळी वाजविण्याचा वेग वाढवा. वेगाबरोबर हातांमधील अंतर कमी करा. वेग आणि आवेग मर्यादा गाठल्यावर हळूहळू वेग कमी करा. साधारणपणे ३०-३२ वेळा टाळी वाजवा. सूर्यनमस्कार एक साधना ६१