पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपण म्हणतो उष्णोदकं समर्पयामि। शुद्धोदकं समर्पयामि || हाच न्याय आपल्या आंघोळीसाठी. आंघोळीनंतर सूर्यनमस्कार घातल्यावर स्नायूंचा अधिक सहभाग कसा मिळतो याचा एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्या. दाबबिंदू सराव (अॅक्युप्रेशर) भगवान श्रीकृष्ण झाडाखाली बसले आहेत. त्यांचे सुंदर, गोरे, गुबगुबीत, गुलाबी पाय व्याधाला दुरून दिसले. ते त्याला पाडसाचे तोंड वाटले. त्याने बाण सोडला. नेमक्या मर्मावर म्हणजेच दाबबिंदुवर बाण लागला. भगवंतांनी हे निमित्त प्रमाण मानले. निसर्गन्यायाला मान्यता दिली. तो स्वीकारला. प्राण सोडला. ही कथा आपल्याला माहीत आहे. पाया पडणे, पादुकांचे दर्शन घेणे, पाद्यपूजा करणे, सद्गुरुंच्या मार्गावर चालणे, चालण्याचा व्यायाम करणे, पुढे चालत राहणे, प्रगती करणे आणि जे कोणी त्याच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर पोहोचतील त्यांच्या पायावर डोके ठेवणे यावरून पाय अत्यंत महत्वाचे आहेत हेच लक्षात येत. पाय व तोंड या रुपकाचा अन्वयार्थ लक्षात घ्या. उदरभरणासाठी अन्न मिळविणे व खाल्लेले अन्न पचविणे यामध्ये पायाचे महत्व स्पष्ट होईल. अॅक्युप्रेशरचे सर्व बिंदु दोन्ही हातांवर आणि पायांवर आहेत. त्या सर्वांना आपण कार्यरत करणार आहोत. आंघोळीच्या वेळेस दररोज पायाचा संपूर्ण तळवा दगडाने दोन तीन मिनिटे घासा. पायाची कड घासा. तळव्याची कड घासा. पायाचे बोटे तसेच अंगठा घासा. चवडा आणि बोटे यामधील भाग घासा. बोटांची टोके घासा. नखे घासा. नखाचे खालील बोट घासा. बोटांच्या खाली दोन-तीन इंचाचा भाग घासा. ही क्रिया साधारणपणे दोन-तीन मिनिटे करा. पाय बदलून हीच क्रिया करा. हातावरील दाबबिंदू अॅक्युप्रेशरचे सर्व दाबबिंदु दोन्ही हातांवर आहेत. त्या सर्वांना आपण कार्यरत करणार आहोत. आपण आरती म्हणतांना, जयजयकार करतांना, सुरांची सूर्यनमस्कार एक साधना ६०