पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करायचे आहे. 3 सूर्यनमस्कार साधनेत सर्व स्नायूपेशीचे सहकार्य मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्याने, अधिकाधिक प्रयत्न, क्रमाक्रमाने, सावकाश, जाणिवपूर्वक करावयाचे आहेत. यासाठी प्रत्येक कृती करतांना मन एक अग्र करा. प्रशिक्षण काळात आपण करत असलेली प्रत्येक क्रिया पुढील कृती अधिक चांगली होण्यासाठी करतो आहोत. अधिकाधिक स्नायूपेशींचा सहभाग वाढविण्यासाठी करतो आहोत. स्नायूपेशींना अधिकाधिक प्राणतत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी करतो आहोत. सूर्यनमस्कार सरावात प्राणायाम, दाबबिंदू शास्त्र (अॅक्युप्रेशर), योगासने यांचे सर्व फायदे मिळणार आहेत. ते फायदे कोणते ते आजच्या सरावात बघावयाचे आहेत. 0 ● O ● ● O - सुरुवातीला एखाद दुसरा प्रकार घेऊन त्याचा चांगला सराव करा. प्राणायाम प्रकार प्राथमिक स्वरुपात शिकण्यासाठी किती आवर्तने करणे अपेक्षित आहे याचा उल्लेख केलेला आहे. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी प्राणायामाचे प्रकार, पद्धत व आवर्तने यात बदल / वाढ करणे गरजेचे आहे. स्नान विधी आपल्या प्रकृतीला झेपतील असे, सोयीचे, सोपे प्रकार दररोजच्या सरावात समाविष्ट करा. शौच विधीनंतर स्नान करणे अपेक्षित आहे. आंघोळ प्रथम क्रमांकाचे शरीर संचलन (warming up) आहे. गार आणि गरम पाणी यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीचे आकुंचन प्रसरण होते. आंघोळ करतांना अनेक वेळा ही क्रिया होते. यातून सर्व पेशींना अभ्यंग (मसाज) होते. त्या कार्यरत होतात. रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. स्नायूंची लवचिकता वाढते. आंघोळ झाल्यावर आपण उत्साही व प्रसन्न असतो. हा दररोजचा अनुभव आहे. पूजेमध्ये स्नानविधी आहे. त्यावेळी 3 अयुक्ताभ्यासयोगेन सर्व रोग समुद्रव हटयोग प्र. २/१६ अयोग्य पद्धतीचा वापर केल्यास कोणत्याही रोगाचा उपद्रव होऊ शकतो. सूर्यनमस्कार एक साधना ५९