पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थूल शरीर जड आहे. ते विकारी आहे. त्याला रोग-व्याधी - विकार यांची बाधा होते. सूक्ष्म शरीर उद्गोचर नाही. स्थूल शरीराच्या माध्यमातून ते अनुभवास येते. कारण सूक्ष्म शरीर स्थूल शरीराची प्रेरणा आहे. संपूर्ण शरीर अवयवांची ऊर्जा आहे. हे सूक्ष्म शरीरसुद्धा विकारी आहे. त्याला काम-क्रोध- मोह-माया इत्यादी विकास जडतात. हे दोन्ही कोश समस्थितीमध्ये आणायचे आहेत. त्यांना विकारमुक्त करावयाचे आहे. अन्नमय शरीराचे भरण-पोषण पौष्टिक आहार, योगासन, व्यायाम यातून साध्य होतो. सूक्ष्म शरीर म्हणजेच प्राणमय कोश हा प्राणायामाने शुद्ध करता येतो. प्राणाचा आयाम करून विकारी मन शांत करता येते. त्याची क्षुद्र- स्वार्थी अवस्था कमी होते वैश्विकभाव वाढिला लागतो. मन या शब्दाला समान अर्थी पर्यायी शब्द आहे वायू. आपले मन वायूप्रमाणेच चंचल व सामर्थ्यवान आहे. भीमकाय असलेल्या मारूतीचे वर्णन 'भीमरूपी स्तोत्र' यामध्ये केलेले आहे. हे सर्व वर्णन आपल्या प्रत्येकाच्या मनाला लागू पडते. मनाच्या अचाट सामर्थ्याची झलक "World Record" च्या पुस्तकांमध्ये वाचावयास मिळते. मन वायूप्रमाणेच अती चंचल आहे. वायूप्रमाणेच ते पकडता येत नाही. त्याला स्थिर ठेवण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी वारंवार अथक प्रयत्न करावे लागतात. एकदा मनाने मनावर घेतले की मग मात्र काम फत्ते. मन आपले सर्व सामर्थ्य पणाला लावते. सर्व कर्मेन्द्रिये व ज्ञानेंद्रिये यांचे सहकार्य घेते. हे स्वीकृत कार्य यशस्वीपणे पूर्ण करते. आपल्याला किर्ती-संपत्ती प्रदान करते. प्राणायामेन युक्तेन सर्वरोग क्षयोभवेत हटयोग प्र. २/१६ योग्य पध्दतीने प्राणायाम केल्यास सर्वरोगांपासून मुक्ती मिळते. हे सूत्र लक्षात ठेवून आपण प्राणायामाचा सराव करणार आहोत. करन्यास करतांना आपण हातावरील पेशींच्या अणू-रेणू पर्यंत प्राणतत्त्व पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्राणायामात हीच क्रिया संपूर्ण शरीरामध्ये करण्याचा प्रयत्न हळूहळू करावयाचा आहे. सर्व स्नायू पेशींचा निर्णायक आहार प्राणतत्त्व आहे. प्राणतत्त्व किंवा प्राणवायू प्रत्येक पेशींच्या आरोग्याचा तसेच अस्तित्वाचा निर्णय करतात. प्राणशक्तीचे आपल्या शरीरातील वास्तव्य म्हणजे आपले जीवन त्याचे शरीरातील अधिक्य म्हणजे आपले आरोग्य प्राणतत्त्वाचा अधिक पुरवठा करून पेशींना कार्यक्षम सूर्यनमस्कार एक साधना ५८