पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। सरावसत्र दिवस पहिला सूर्यनमस्कार पूरक प्राणायाम हवेत प्राणतत्त्व / प्राणशक्ती आहे. हीच वैश्विकऊर्जा आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत म्हणून वैश्विकशक्ती विश्वामध्ये सर्वत्र भरून उरलेली आहे म्हणूनही सर्व विश्वाची शक्ती. ही प्राणसंजिवनी श्वसनावाटे आपण आत घेऊ शकतो. त्याचा वापर करू शकतो. म्हणून आपण स+जीव आहोत. श्वसन क्रिया नियंत्रित करणे म्हणजे प्राणायाम करणे. प्रयाणं कुरुते वायुः तस्मात् इति ईरितः वशिष्ठ संहिता प्राणाचा आयाम करणे, श्वास लांबविणे म्हणजे प्राणायाम प्रयाण करणारा म्हणून तो प्राण. या वैश्विक प्राण शक्तीला किंवा चैतन्याला समर्थ रामदास स्वामी आत्माराम किंवा जगत्ज्योती म्हणून संबोधतात. हे चैतन्य म्हणजेच वातावरणातील व अंत:करणातील उत्साह- आनंदाचा स्त्रोत होय. हवेमध्ये वायूची हालचाल सुरू झाली की हे चैतन्य स्वरूप आनंददायी आहे याची जाणिव होते. थंडगार झुळूक, गरम झळा, सोसाट्याचा वारा किंवा वादळ ही हवेची उग्र रुपे. वायू शक्तीरूप आहे. सामर्थ्यशाली आहे. तो आपले प्राण धारण करणारा आहे. तोच जीवाला ऊर्जाशक्ती देवून कार्यरत ठेवतो. म्हणून त्याला 2 प्राण-शक्ती म्हणतात. बलभीम मारूती हा वायू पुत्र शक्ती- सामर्थ्य आणि बुद्धी-विवेक यांचे मूर्तिमंत रूप. तो सर्वांच्या अंतर्यामी वायूरूपाने वास करणारा आहे. आपले प्राण धारण करणारा आहे. 'महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे,' हे त्याचे रूप आहे. अन्नमय कोश म्हणूजे स्थूल शरीर प्राणमय कोश म्हणजे सूक्ष्म शरीर. 1 वायूचा प्रताप समजण्यासाठी श्रीमद् दासबोध यामधील दशक १६ समास ०६ वायोस्तवन वाचा. 2 सर्वसाधारण श्वसन प्रक्रियेत आपण साधारणपणे ३०० ते ४०० सी.सी. हवा फुफ्फुसात घेतो. यौगिक श्वसनात हेच प्रमाण ५००० सी.सी. होते. याचाच अर्थ असा की आपण फुफ्फुसाची क्षमता १०% सुद्धा वापरत नाही. सूर्यनमस्कार एक साधना ५७