पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। श्रीमद् ग्रंथराज दासबोध सद्गुरु समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधामध्ये आद्य सनातन वैदिक हिंदुधर्म सांगितलेला आहे. || यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् । संपूर्ण विश्वामध्ये जे जे काय आहे ते ते सर्व आपल्या शरीरात आहे. जे येथे नाही ते कोठेही सापडणार नाही (पिंडी ते ब्रह्मांडी) हे स्पष्ट केलेले आहे. विश्व आणि जीव यांचे ऐक्य स्पष्ट करतांना भूमी पाण्यात लय पावते, पाणी अग्नीत, अग्नी वायूत, वायू आकाशात, आकाश अहंकारात, अहंकार बुध्दीमध्ये, बुध्दी जीवामध्ये, जीव अव्यक्तात, अव्यक्त आत्म्यात हे सूत्र अगणीत दाखले देऊन मनावर ठसवले आहे. आपल्या आयुष्याला या निसर्ग न्यायाचे (धर्मतत्त्वाचे) अधिष्ठान द्या. आदिमाया, आदिशक्ती, मरुत - मारुतीची उपासना करा. आई- मात्रृभूमिची सेवा करा आणि कीर्तिरुपे चिरंजीव व्हा. हा संदेश सर्वांना दिलेला आहे. सूर्यनमस्कार एक साधना ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ५६