पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृचाकल्प सूर्यनमस्कार, व्यायामासाठी घातलेले सूर्यनमस्कार इत्यादी इतर प्रकार आहेत. तीन शरीर स्थिती असलेला सूर्यनमस्कार, नऊ+ एक शरीर स्थिती असलेला सूर्यनमस्कार, बारा शरीर स्थिती असलेला सूर्यनमस्कार, पंधरा शरीर स्थिती असलेला सूर्यनमस्कार असे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये आसनांची झालेली द्विरुक्ती यामध्येही विविध प्रकार आहेत. सूर्यनमस्कारातील काही आसनांना पर्यायी नावे आहेत. या नावावरून त्या आसनातील प्रगत कौशल्यांचा निर्देश होतो. उदाहरणार्थ एकपाद प्रसरासन, अश्वसंचालनासन व अर्धभुजंगासन ही तिन्ही नावे त्या आसनातील उत्तरोत्तर प्रगत कौशल्यांचा निर्देश करतात. प्रत्येक साधक आपल्या आवाक्याप्रमाणे किंवा अकलनाप्रमाणे सूर्यनमस्कार घालतो. ही त्याची स्वतःची स्वतंत्र अशी पध्दत होऊन जाते. सूर्यनमस्काराचे असे अनेकविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच आदर्श सूर्यनमस्कार शिकविणे हा या कार्यपुस्तिकेचा उद्देश नाही. सूर्यनमस्काराचे प्रकार अनेक नाही असंख्य आहेत. पण तरीही प्रत्येक आसनाचे अधिष्ठान, मर्मस्थान (उर्जाचक्र), उद्देश हे निश्चित आहेत. हा सूर्यनमस्काराचा मूळ गाभा आहे. त्यामध्ये कोणताही बदल संभवनीय नाही. हेच सूर्यनमस्काराचे वैशिष्ठ्य आहे. या त्रयिंच्या माध्यमातूनच सूर्यनमस्कारातील नैसर्गिक न्याय तत्त्वांचा अनुभव येतो. अपेक्षित उद्देश सफल होतो (किंवा नाही) याचा अनुभव येतो. ही सूर्योपासना अंतीम श्वासापर्यंत विद्या-आरोग्य-आनंद अबाधित ठेवते. हाच उद्देश अधिकाधिक प्रमाणात फलद्रुप होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. त्यामधून सूर्यनमस्काराचे अनेक प्रकार अस्तित्वात येतात. सूर्यनमस्कार प्रकारातील विविधता वेगळी काढली आणि एकसूत्रता विचारात घेतली तर 'सूर्यनमस्कार' ही संकल्पना समजणे सोपे जाते. या कार्यपुस्तिकेमध्ये सूर्यनमस्काराची मूळ संकल्पना याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माहितीचे रुपांतर ज्ञानात व्हावे यासाठी बुद्धी- मनाला शरीराची जोड दिलेली आहे. त्यासाठी बारा सूर्यमंत्र व बारा शरीरस्थिती असलेला सूर्यनमस्कार हा प्रकार विचारात घेतलेला आहे. कारण ज्ञान या शब्दाचा अर्थच आहे 'प्रत्यक्ष अनुभूती'. ज्ञान म्हणजे स्मृती व अज्ञान म्हणजे विस्मृती. या शक्ती उपासनेची अनुभूती फक्त प्रत्यक्ष सरावातून येऊ शकते. कृतीवाचून वाचाळता करणाऱ्यांना समर्थांनी 'शालजोडीतला' दिलेला आहे. अनुभवेविण ज्ञान ते श्वानाचे वमन । भले तेथे अवलोकन कदापि न करी ।। सूर्यनमस्कार एक साधना दासबोध viii