पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योग्य अनुभव येण्यासाठी सुयोग्य पद्धतीने अचूक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न पध्दतशीर नसतील तर आपले दोष लक्षात येणार नाहीत. सदोष साधनेतून विपरित अनुभव येतील. साधना खंडित होईल. अचुक येत्न करवेना । म्हणौन केले ते साजेना। आपला अवगुण जाणवेना | काही केल्या।। दा.१२-२-६ सूर्यनमस्कार साधनेकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक करायचा आहे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी खुजी असल्यास ती वस्तू मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न निस्तेज असतात, अल्प असतात, अल्पायुषी असतात. त्या प्रयत्नातून मिळणारे फळही बलहीन असते, स्वार्थी असते. व्यापक दृष्टीकोन प्रयत्नांची व्याप्ती वाढवितो. त्याचा परिणाम बलसंपन्न, तेजस्वी, निस्वार्थी, सर्वसमावेशक करतो. आपल्या देशातील तरुण वर्गाची लोकसंख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. सत्तास्पर्धेत आघाडीवर राहायचे असेल तर 'तरुण लोकसंख्या' सामर्थ्यवान असणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार नित्यकर्म साधना आपली पराभूत मनोवृत्ती भस्म करून जगत्जेत्याचे सामर्थ्य प्रत्येकाला प्रदान करणारी आहे. विश्व विजय कर दिखलाएँ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलेही योगदान सुरू होते आहे. अभिनंदन. सूर्यनमस्काराची दीक्षा घ्या. आत्मतेज वाढवा. ज्योतीने ज्योत पेटवा. पराक्रमाच्या प्रकाशाने विश्व विजय निश्चित करा. समर्थस्तोत्र ( शार्दूलविक्रीडित) श्रीधरस्वामी महाराज राष्ट्रा ऊर्जितकाल हा जरी हवा सांगे हिता चांगले । लावा की जनि लक्ष या प्रभुपदी वागा जसे बोधिले । राष्ट्रा सद्गुरू हेचि मानुनी पदी लीनत्वि गर्जु भले । विश्वोध्दारी विभु समर्थ जगती त्यांची नमी पाउले ।।१६।। सुभाष भगवंतराव खर्डेकर अध्यक्ष नासिक || दररोज. || श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये ॥जय जय रघुवीर समर्थ || सूर्यनमस्कार एक साधना ix