पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आंघोळ करा. सूर्यनमस्कार करण्यासाठी आसन बरोबर आणा. एक हातरुमाल बरोबर ठेवा. तक्ता क्रमांक चाळीस पंधरा मिनिटांमध्ये तीन सूर्यनमस्कार घाला. शरीराच्या कोणत्या भागाला कोणता-कसा- किती ताण किंवा दाब दिलेला आहे याकडे लक्ष द्या. शरीराचा इतर भाग ताण किंवा दाब रहित आहे हे अनुभवा. आसन स्थितीमध्ये उच्चतम स्थिती प्राप्त केल्यावर थोडावेळ थांबा नंतरच सर्वताण मोकळा करा. शरीराच्या ज्या भागाला ताण- दाब दिलेला आहे त्याच भागातून ताण- दाब मोकळा होतो आहे याकडे लक्ष ठेवा. तक्ता क्रमांक एक्के चाळीस सूर्यनमस्कार पाच तत्त्व ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा म्हणजे शक्ती तयार होते याचा अनुभव घ्या. स्नायूंना अनावश्यक ताण-दाब, जोर-झटका देऊ नका. स्नायूंचा ताठरपणा कमी करण्यासाठी शरीराला त्याचा वेळ घेऊ द्या. स्नायूची तसेच मनाची ताकद त्यांच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यांच्या वजन-आकारावर नाही. शरीरातील ९५% स्नायू कार्यरत करावयाचे आहेत याकडे लक्ष द्या. स्नायूंनी केलेला व्यायाम व त्यांना दिलेला प्राणतत्त्वाचा खुराक यामध्ये संतुलन ठेवा. सूर्यनमस्कार एक साधना ५३