पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिक चिन्हातील बोधवाक्य || यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।। श्लोकाचा अर्थ : संपूर्ण विश्वामध्ये जे जे काय आहे, ते ते सर्व आपल्या शरीरात आहे. जे येथे नाही ते कोठेही सापडणार नाही. यदिहास्ति तदन्यत्र यत्रेहास्ति सूर्यनमस्काराचा सराव करतांना सर्वसाधारणपणे आपण हस्तपासादन योग्य पद्धतीने करत नाही. आपली एक चुकीची समजूत आहे की सूर्यनमस्कार चांगले घालता येणे म्हणजे या आसनात कपाळ दोन्ही गुडघ्यांना लावणे. ही आदर्श स्थिती करता यावी म्हणून अयोग्य ठिकाणी अनावश्यक व चुकीचा दाब देतो. कमरेच्या स्नायूंवर जोर जबरदस्ती करतो. याचा परिणाम म्हणजे पाठ दुखणे सुरू होते. आपली इच्छ नसतांना, या पाठ दुखीमुळे सूर्यनमस्कार साधनेमध्ये खंड पडतो. सूर्यनमस्कार प्रतिक चिन्ह आपल्याला तीन महत्वाच्या नियमांची आठवण करून देते. नसत्वयचित् एक हे आसन करतांना स्वाधिष्ठान चक्राचा भाग उचलून धरा. खाली वाकल्यावर मान - खांदे - हात ताणमुक्त ठेवा. ( सदंर्भ बघा कार्यपुस्तिका) - - दोन – कोणत्याही प्रकारचे स्नायूंचे दुखणे सुरू न होता सूर्यनमस्काराची साधना अखंडितपणे सुरू ठेवणे हे आपले साधनेतील दररोजचे उद्देश आहे. - तीन - सूर्यनमस्कार साधनेमध्ये श्रद्धा, सबुरी, सातत्य ठेवा. आज नाही उद्या तुम्हाला साधनेतील सर्व फायदे मिळणार आहेत याची खात्री बाळगा. (संदर्भ उत्तरार्ध, शंकासमाधान) बघा सूर्यनमस्कार एक साधना सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सत्र प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० ते ८.०० बौद्धिक व पूर्वतयारी रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार सकाळी ६.३० ते ८.०० प्रात्यक्षिक व सराव श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. (एफ- ११९३४ नासिक) संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। ५१