पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या आसनातून मी तुम्हा सर्वांना नमस्कार केला. तुम्ही मला केलेला नमस्कार स्वीकारला. तो तुमच्या गुरुमाऊलीकडे सुपूर्त केला. प्रत्येकाचे जीवन- विश्व आपली आई असते. आई हाच सर्वांचा प्रथम गुरू असतो. त्याचे प्रथम ध्यान करा. यातूनच पुढे 30 आदिमाया ( आ + ई म्हणजे आदिशक्ती + परमेश्वर), जगदंबा, कुलदैवत, आराध्यदैवत, इष्टदैवत यांचे पूजन अर्चन सुरू होते. ध्यानामध्ये प्रगती होते. 'अष्टसिद्धी नव निधीके दाता' असे वरदान आपल्या कुलदेवतेकडून मिळते. सर्वमनोकामना सिध्द होतात. सूर्यनमस्कार प्रतिक तक्ता क्रमांक छत्तीस सूर्यनारायणाच्या पार्श्वभूमिवर हस्तपादासनाची आकृती रेखाटली आहे. (स्व) अधिष्ठान चक्राचा भाग ऊर्ध्व दिशेला ताणलेला आहे. अधिष्ठान या शब्दाचा अर्थ आहे 'आधार'. इमारतीला आधार असतो खांबांचा. हा आधार करत काहीच नाही पण तो काढून घेतला तर इमारत हमखास कोसळते. परमेश्वराचा हा आधार म्हणजेच वैश्विकशक्ती. यामुळे सर्व विश्वातील ग्रह-गोल-तारे आपापल्या जागी अधिष्ठित आहेत. हे सूर्यतेज संपूर्ण ब्रह्मांडाचा आत्मा आहे. यालाच परम- तत्त्व, भगवान विष्णू, गॉड किंवा अल्ला म्हणतात. - हस्तपादासन आकृतीचा आकार दोन अर्धगोल समोरा समोर ठेवल्या सारखा आहे. ही आसन स्थिती आपल्याला सूर्यनमस्कारातील उभे-आडवे व पुन्हा उभे (नभोवंदन, भूमिवंदन, नभोवंदन) या आसन चक्राची आठवण करून देते. श्वासोच्छवासाचे अखंडित चक्र तसेच स्नायूंचे सततचे स्फूरण यांचा निर्देश करते. (संदर्भ बघा पूर्वार्ध, करन्यास). मंडल मध्यवर्ती असणाऱ्या सूर्यनारायणाचे हे बीज स्वरूप आहे. संपूर्ण विश्व एक महाशून्य आहे. याचे प्रतिक म्हणजे हस्तपादान! 30 प्राणतत्त्व हवेत असते. गर्भातील बालकालाते आईच्या माध्यमातून मिळते. म्हणून प्राणतत्त्वाचा पुरवठा करणारी हवा ही आपली आदिमाता, आदीशक्ती आहे. (निर्वात प्रदेशात सजीव नाहीत.) सूर्यनमस्कार एक साधना ५०