पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपले म्हणजे झाडाचे लाकूड होते. तसेच आपले आहे. हे जलतत्त्व आपल्याला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवते. यामुळेच चयापचन होऊन आपल्या शरीरातील पेशी नव्याने निर्माण होत असतात. साधारणपणे शंभर दिवसांमध्ये शरीरातील सर्व रक्तपेशी नव्याने तयार झालेल्या असतात. स्वाधिष्ठानचक्र स्थान निश्चिती अ) सरळ बसा. ताठ बसा. दोनही अंगठे कमरेवर (पॅन्टच्या पट्ट्यावर ) मध्यभागी ठेवा. आता दोन्ही अंगठे दोन इंच खाली घ्या. दोन्ही आंगठे या ठिकाणी जोरात दाबा. हे आहे स्वाधिष्टान चक्राचे केंद्र. शरीराच्या या भागाकडे लक्ष देऊन पुढील कृती करायच्या आहेत. गुडघ्यावर उभे राहा. टाचेवर बसण्यासाठी शरीर खाली घ्या. ( वज्रासन) चवड्यावर पार्श्वभाग टेकवा. खाली वाकून कोपर गुडघ्याच्या पुढे टेकवा. हात नमस्कार स्थितीमध्ये आणा. कपाळ हातावर टेकवा. श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे ठेवा. संपूर्ण लक्ष कृतीकडे ठेवा. स्वाधिष्ठान चक्राचे सर्व स्नायू हळूहळू मोकळे करा. या भागातील सर्व स्नायूंचा तणाव काढून टाका. स्नायू मोकळे होता आहेत याचा अनुभव घ्या. याच पध्दतीने कंबर, पाठ, खांदे, मान, डोके यांचा ताण मोकळा करा. मन एकाग्र करून समर्पण भावाने गुरूवंदन श्लोक म्हणा. आपल्या आईचा हसरा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आणा. गुरुवंदन श्लोक व सर्व स्नायू मोकळे ठेवण्याची कृती आणखी दोन वेळा करा. प्रत्येक वेळेस स्नायू अधिक ताणमुक्त करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेऊन तळवे जमिनीवर टेकवा. श्वास घ्या तळवे जमिनीवर दाबा, खांदे वर उचला. श्वास घ्या गुडघे सरळ करा. श्वास घ्या तळव्याने व पंजाने जमीन खाली रेटा त्याचबरोबर स्वाधिष्ठान चक्र वर उचला. थोडा वेळ थांबा. हळूच ताण मोकळा करा. श्वास सोडत वज्रासनात बसा. आरामात बसा. सूर्यनमस्कार एक साधना ४९