पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नायूंपेशींच्या तीन गती शरीरातील स्नायूंमध्ये तीन प्रकारच्या गती असतात. पहिला प्रकार आहे सर्पासारखी गती. याचे उदाहरण म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया. अन्न गिळण्याची क्रिया, अन्न पोटाकडे सरकण्याची क्रिया. दुसरा प्रकार आहे घुसळण्याची / गिरक्या घेण्याची गती. याचे उदाहरण आहे जठरातील अन्नाचे पचन करण्यासाठी पचन संस्थेला मिळणारी घुसळण्याची गती. तीसरी गती आहे स्नायूंचे सततचे, अखंडितपणे पुन:पुन्हा विस्फारणे, स्फुरण पावने. अर्थात करन्यासामध्ये अनुभव घेतल्याप्रमाणे या गतींवर आपले अजिबात नियंत्रण नसते. आपले मन व बुद्धी टीव्हीवर अंत्यविधीचे दृष्य हण्यात गढून गेलेले असते. जठराच्या पचन क्रियेकडे तसेच जठराच्या गतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे जठराची स्वाभाविक गती सुरू होते. गतीचा वेग वाढतो. अन्नाचे पचन सुरू होण्यापूर्वीच ते जठरातून पुढे छोट्या आतड्यात ढकलले जाते. छोटे आतडे एखाद्या लांबलचक नळीसारखे आहे. पण ते ताणून सरळ केले आणि मोजले तर साधारणपणे ७० ते ७२ चौरस फूट भरते. हा फार मोठा आकार झाला. तुम्ही बसलेल्या खोलीची लांबी-रुंदी लक्षात घ्या म्हणजे हा आकार किती मोठा आहे हे लक्षात येईल. छोट्या आतड्याच्या आतील भागावर बोटांसारखे तंतू असतात. ते पोषक अन्नघटक शोषून घेतात व इतर अवयवांकडे पाठवितात. पण स्नायूंची गती वाढलेली असल्यामुळे या तंतूंना अन्नरस शोषून घेण्यास अवधी मिळत नाही. त्या अगोदरच हा अर्धवट पचन झालेला अन्नरस पुढे मोठ्या आतड्यात ढकलला जातो. आपल्याला पोट साफ करण्याची अनिवार इच्छा होते. अन्नातील पोषक द्राव शौच्यावाटे जोराने बाहेर फेकले जातात. शरीरातील हा जलाधार बाहेर पडल्यामुळे स्नायूंची शक्ती क्षीण होते. सर्वच अवयव गर्भगळित होतात. झाडे वनस्पती पाण्यावर वाढतात. पाण्यामुळे जगतात. 29 त्यातील पाणी 29 श्रीमद् ग्रंथराज दासबोध यामध्ये आपनिरूपण दशक १६ समास ०४ आहे. यामध्ये पाण्याचा प्रताप समर्थांनी स्पष्ट केलेला आहे. तसेच इतर पंचमहाभूतांचे वर्णनही याच दशकात आलेले आहे. सूर्यनमस्कार एक साधना ४८