पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अधिष्ठान म्हणजे आधार. हे चक्र आपल्या 'स्व'चा म्हणजेच आपल्या शरीराचा पायाभूत आधार आहे. यामुळे शरीरातील सर्व अवयव एका ठिकाणी व विशिष्ट आकारात बांधले जातात. शरीराला डौल व सौंदर्य प्राप्त होते. आपल्या शरीरात एकूण ७२,७२,७२,७२७ छोट्या मोठ्या रक्त वाहिन्यांचे जाळे आहे. त्यातील महत्वाच्या 28 बहात्तर हजार नाड्या या ठिकाणी एकमेकांना छेदून सर्व शरीरभर पसरलेल्या आहेत. 'स्व' या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आत्मा, जो परम - आत्म्याचे पूर्णरूपच आहे. हा आत्मा शरीराच्या माध्यमातून कार्य करवून घेतो. शरीर नसेल तर आत्म्याचे अस्तित्व कार्यशून्य होते. संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहे विराट पुरुषाचा आत्मा, म्हणजे वैश्विक शक्ती. या वैश्विक शक्तीमुळे अवकाशातील सर्व ग्रह- गोल-तारे त्यांचे ठिकाणी स्थिर राहून आपापल्या कक्षेमध्ये ठराविक गतीने प्रदक्षिणा घालत असतात. हे 'स्व' चे (शरीराचे) अधिष्ठान व आत्म्याचे अधिष्ठान एकच आहे आणि ते म्हणजे 'वैश्विक शक्ती'. या दोन्ही अधिष्ठानांचा संयोग या आसनामध्ये घडवून आणायचा आहे. स्वाधिष्ठान चक्राचे अधिष्ठान आहे जल तत्त्व, पृथ्वीवर जल व जमीन यांचे प्रमाण एकास तीन असे आहे. शरीरातील द्रव व घन पदार्थाचे प्रमाण साधारणपणे हेच आहे. शरीरामधील जल तत्त्वाचे महत्व लक्षात येण्यासाठी जठरामधील द्रव स्वरूपातील पोषक अन्न घटकांचे पचन कसे होते ते थोडक्यात बघू. घरातील सर्वजण जेवायला बसले आहे. टीव्ही सुरू आहे. अचानकपणे टीव्हीवर अंत्यविधीचे दृष्य सुरू होते. रडणे-ओरडणे, सूड- दुःख या भावना प्रभावीपणे प्रसारित होतात. आपले मन व बुद्धी या भाव-भावनांनी भारावून जातात. अन्न स्वीकारणे व त्याचे पचन करणे या दोन्ही क्रियांकडे त्यांचे संपूर्ण दुर्लक्ष होते. बहात्तर हजार नाड्यांमध्ये सोळा सहस्त्र नाड्या भगवंताच्या भार्या आहेत. त्या परमतत्त्वाची सेवा करणे हा त्यांचा धर्म आहे. यातील आठ नाड्या अष्टांग योग किंवा अष्टसिद्धी देणाऱ्या आहेत. त्यातील तीन नाड्या सूर्यनाडी, चंद्रनाडी, सुषुम्ना यांना त्रिवेणी संगम म्हणतात. यातील सुषुम्ना नाडी सर्वश्रेष्ठ, सूर्यनमस्कार एक साधना 28 ४७