पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. हात खांद्यातून मागे ढकला. श्वास घ्या. डोके मागे ढकला. आणखी एकदा श्वास घ्या. डोके मागे ढकला. मान खांद्यामध्ये पकडा. क) पार्श्वभाग मोकळा ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. मान सरळ करा. हात सरळ करा. शरीराच्या कोणत्या भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. शरीराला मिळालेला ऊर्ध्व ताण सुरुवातीला हात, खांदे, छाती येथील भागावर जाणवेल. जसा सराव वाढेल तसा हा ताण पायाच्या घोट्यापासून हातांच्या बोटापर्यंत पसरेल. स्वाधिष्ठानचक्र, स्थान निश्चिती व महत्त्व तक्ता क्रमांक पस्तीस चक्राचा रंग – केशरी. चक्राचे स्थान मणक्याचे शेवटचे टोक. - 27 चक्राचे अधिष्ठान जल. शरीरावर परिणाम प्रभावित अवयव - - आहारवृद्धी, गाढ निद्रा. जीभ, मेंदू. स्वाधिष्ठान चक्राचा प्रत्यक्ष वापर हस्तपादासन दोनदा आणि भुजंगासन एकदा असा तीन वेळा होतो. या चक्राचा अप्रत्यक्षपणे वापर स्थिती एक, अकरा, बारा (प्रणामासन, प्रणामासन, प्रणामासन + मुद्रा) सोडून सर्व आसन स्थितीमध्ये केला जातो. शरीरातील याचे स्थान आहे मेरुदंडावरील शेवटचा मणका. 27 जेथे जल आहे तेथे जीवन आहे हा भौतिक शास्त्राचा सिद्धांत. या सिद्धांताला जीवशास्त्राने मान्यता दिलेली आहे. भाषाशास्त्राने जीवन-जीव हे समानार्थी शब्द म्हणून शब्दकोशात स्वीकारले आहे. सूर्यनमस्कार एक साधना ४६