पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक कुटुंब सूर्यनमस्कार साधनेचे व्यासपीठ व्हावे, कुटुंबातील प्रत्येक सदस्य सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावा यासाठी आपण जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. विशुद्धचक्र स्थान निश्चिती अ) हे आसन आपण तीन टप्प्यामध्ये करणार आहोत. बसूनच करणार आहोत. हात सरळ वर उचला. दोन हातांमध्ये खांद्याचे अंतर ठेवा. दंड कानाजवळ येतील याकडे लक्ष द्या. दोन्ही हाताचे पंजे समोरासमोर ठेवा. दोन्ही हातांच्या मुठी आवळा. श्वास घेत, पंजे सरळ करत, हात डोक्यावर उंच उचला. हात ताठ ठेवा. थोडं थांबा, श्वास सोडत मुठी वळत हात खाली घ्या. श्वास घेत हात डोक्यावर अधिक उंच उचला. हात ताठ ठेवा. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. पार्श्वभाग सैल सोडा. मोकळा सोडा. - ताण स्वीकारा. थांबा. श्वास सोडत हात खाली घ्या. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घेत हात डोक्यावर अधिक उंच उचला. हात ताठ ठेवा. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. पार्श्वभाग सैल सोडा. मोकळा सोडा. पोटाचे, मानेचे सैल सोडा. स्नायू ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडत हात खाली घ्या. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. हात खांद्यातून मागे ढकला. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा. आणखी एकदा श्वास घ्या. हात खांद्यातून मागे ढकला. ब) दृष्टी हाताच्या तळव्यावर ठेवा. पोटाचे मानेचे स्नायू सैल सोडा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. दोन्ही हात सरळ करा. सर्व स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. सूर्यनमस्कार एक साधना ४५