पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काखेत ही उब जास्त प्रमाणात जाणवेल. जेवण झाल्यावर पचन संस्थेकडे ऊर्जेचा अधिक पुरवठा केला जातो. डोक्यातील ऊर्जा वाढल्यास डोके दुखणे, केस गळणे, पांढरे होणे, चिडचिड वाढणे, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी परिणाम दिसून येतात. पोटातली ऊर्जा म्हणजेच जठराग्नी, तो कमी झाल्यास भूक कमी होते, अपचन होते, पाठ-पाय-गुडघे दुखतात, अशक्तपणा येतो इत्यादी अनेक त्रास सुरू होतात. जो शारीरिक व्याधीपासून मुक्त असतो तो आरोग्य संपन्न असतो. तो स्वस्थ म्हणजे स्व-स्थित असतो. त्याच्या चेहऱ्यावर तेज असते. याउलट रोग, व्याधी, व्यसन, विकास असलेला चेहरा काळजीमुळे व कुपोषणामुळे निस्तेज दिसतो. विशुद्ध चक्राचे अधिष्ठान अवकाश आहे. अवकाशामध्ये प्रणव उच्चार झाला आणि तेथून विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात झाली. या चक्राचा प्रभाव आपल्या वाचेवर आणि श्रवणेंद्रियावर होतो. आपले विचार कृतीमध्ये आणण्यासाठी मदत होते. कान-तोंड - हात यांचे परस्पर सहकार्य व संतुलन वाढते. यामुळे सूर्यनमस्काराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते. विशुद्ध चक्राचे अधिष्ठान अवकाश आहे. म्हणूनच जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होतो. मनाच्या कक्षा विस्तारतात, अमर्याद होतात. मन आकाशाएवढे मोठे होते. एखाद्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे संकुचित दृष्टीकोनातून बघितले तर आपल्या मनाच्या कक्षा अरुंद होतात. आपली वृत्ती कोती होते. आपण स्वार्थी होतो. जर आपण आपला दृष्टिकोन व्यापक करण्याचा प्रयत्न केला तर विशुद्ध चक्र, मन-बुद्धीची मदत घेऊन मदतीला येते. आपल्या अत:चक्षुची मर्यादा 26 सूर्यमंडळला भेदून शून्यमंडळात पोहचते. म्हणून सूर्यनमस्काराची कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करा. हा फक्त व्यायाम प्रकार नाही तर एक साधना आहे. त्याला व्यक्तीच्या मर्यादा घालू नका. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सूर्यनमस्कार शिकविणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. जगातील अवकाशात अनेक सूर्यमाला आहेत. त्यातील ग्रह-गोल-तारे नव्याने तयार होतात आणि नष्टही होतात. या सूर्यमंडलाच्या पलीकडे काहीच नाही आणि तेच शून्यमंडळ, ते अपरिवर्तनिय आहे. शाश्वत आहे. सत्य आहे. सूर्यनमस्कार एक साधना 26 ४४