पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न तिसरा - हे आसन अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही हातांचा उपयोग तरफे सारखा करावयाचा आहे. अनाहत चक्राकडे लक्ष द्या. श्वास झटकन बाहेर फेका. त्याचवेळी दोन्ही हात एकदम दाबा. दाब मोकळा करा, श्वास घ्या. छाती विस्फारल्याची संवेदना स्वीकारा. आणखी दोन वेळा ही क्रिया करा. आरामात उभे रहा. काहींना हे आसन अवघड वाटत असल्यास तिसरा प्रकार प्रथम काही दिवस करा. विशुद्धचक्र, स्थान निश्चिती व महत्त्व तक्ता क्रमांक चौतीस - चक्राचा रंग धुरकट. राखाडी.. स्थान मानेवर. तिसरा मणका. चक्राचे अधिष्ठान अवकाश. शरीरावर परिणाम नाद आणि शब्द. प्रभावित अवयव कान, स्वरयंत्र. विशुद्ध चक्राचा वापर उर्ध्वहस्तासन, मकरासन आणि पर्वतासन या तीन आसनामध्ये केला जातो. इतर सर्वच आसनामध्ये या चक्राचा अप्रत्यक्षपणे वापर केला जातो. हे शक्ती केंद्र आपल्या शरीराला तसेच मन-बुद्धीला विशेष शुद्धी देणारे चक्र आहे. हे चक्र मेरुदंडावर मानेतील तिसऱ्या मणक्यावर आहे. प्रत्येक श्वासात घेतलेले प्राणतत्त्व या ठिकाणी संकलित केले जाते. प्रत्येक अवयवाची जशी मागणी असेल त्या प्रमाणात प्राणतत्त्वाचे वितरण येथूनच केले जाते. प्रत्येक अवयवाची ही मागणी वेगवेगळी असते. तसेच परिस्थितीनुसार या मागणीमध्ये बदल होत असतात. डोक्यावर हात ठेवा तेथे टाळूचा भाग उबदार लागेल. पण सूर्यनमस्कार एक साधना - - - - ४३