पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या भागाला ताण दिलेला आहे त्याच भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. प्रयत्न दुसरा मला वाटते तुमचा ताण चुकीच्या ठिकाणाहून मोकळा झालेला आहे. याचा अर्थ ताण देण्यामध्ये चूक झालेली आहे. या आसनात झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक कृती करतांना श्वास सोडण्याकडे लक्ष द्या. श्वास सोडतांना किंवा श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर कृती करा. एक आसन पूर्ण करतांना अनेक वेळा आपण श्वास घेणार- सोडणार आहोत. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे म्हणजे 25 उच्छवासापेक्षा अधिक प्रमाणात प्राणतत्व श्वासावाटे शरीरात घेणे होय. अनाहत चक्राकडे लक्ष द्या. श्वास सोडा, दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर जोरदार दाबा. हा दाब हाताचे पंजे, मनगट, हात, दंड, खांदे आणि छाती असा आहे. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. श्वास सोडा, दोन्ही हातांचे पंजे दाबा आणि कोपर शरीरा लगत घ्या. मोकळे व्हा. श्वास सोडा, तुमचे खांदे वर उचललेले आहेत. श्वास सोडा, सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबा, कोपर शरीरालगत घ्या, खांदे खाली ओढा, मान सरळ दृष्टी समोर ठेवा, पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. ज्या भागाला ताण दिलेला आहे त्याच भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. करन्यासात शरीरावर प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नियम- ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा म्हणजे शक्ती तयार होते. सूर्यनमस्कार एक साधना 25 ४२