पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तक्ता क्रमांक तेहतीस सावधान स्नायुंना दिलेला ताण फार वेळ पकडून ठेऊ नका. ताण स्वीकारा व लगेच सोडून द्या. चुकीचा ताण लगेच त्रास देण्यास सुरुवात करतो. ताण मोकळा करण्यासाठी माझ्या सूचनेची वाट पाहू नका. ताण मोकळा होतांना तो कोणत्या स्नायूंपासून मोकळा होतो याकडे लक्ष द्या. ज्या स्नायूंना ताण - दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे होता आहेत याकडे लक्ष द्या. ● . ० O 0 ● - अनाहतचक्र स्थान निश्चिती प्रयत्न पहिला सरळ उभे रहा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. मान ताठ दृष्टी सरळ ठेवा. अंगठ्याचे मूळभाग छातीच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागात ठेवा. - सगळी बोटे एकमेकांना चिकटवा. अंगठे व तर्जन्या एकमेकांना चिकटवा. अंगठे छातीपासून दूर आहेत, ते छाती लगत घ्या. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबून धरा. हा दाब हाताचे पंजे, मनगट, हात, दंड, खांदे आणि छाती असा आहे. मान सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. स्नायूंचा ताण मोकळा करा. (ही सूचना पूर्ण सराव सत्रामध्ये शब्दश: पाळावयाची आहे.) तुमचे कोपर शरीरापासून दूर आहेत. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबा आणि कोपर शरीरा लगत घ्या. मोकळे व्हा. तुमचे खांदे वर उचललेले आहेत. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबा, कोपर शरीरा लगत घ्या, खांदे खाली ओढा, मान सरळ, दृष्टी समोर ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. सूर्यनमस्कार एक साधना ४१