पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सतत स्मरण याची आवश्यकता आहे. मारुतीराया आपली छाती उघडी करतो. त्यामध्ये श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती दिसतात. आत्मारामाचा निवास या ठिकाणीच असतो. तो तेथे नसला म्हणजे सर्व संपले. हे चक्र म्हणजे छातीचा सर्व भाग. याचा उपयोग कसा करता येईल हे बघू. चक्राचा रंग सोनेरी पिवळा. उगवत्या सूर्याचा. चक्राचे स्थान छातीमध्य. चक्राचे अधिष्ठान शरीरावर परिणाम प्रभावित अवयव अनाहत चक्राचा वापर शरीर स्थिती एक व अकरा ( प्रणामासन) आणि शेवटची बारावी स्थिती ( प्रणामासन + नमस्कार मुद्रा) यामध्ये केला जातो. अनाहत म्हणजे आघात न करता उत्पन्न झालेला ध्वनी. गर्भावस्थेपासून हा नाद आपली साथ करतो आहे. वातावरणात असलेली वैश्विकशक्ती आपण श्वसनातून फुफ्फुसामध्ये घेतो. शरीरातील प्रत्येक पेशी, त्यातील अणू-रेणू, त्यातील अवकाश या वैश्विकशक्तीचा स्वीकार करतांना स्फुरण पावतात. प्रत्येक श्वासागणित बाहेरील अवकाश व शरीरातील अवकाश यांचा संयोग होतो. या दोन्ही अवकाशांचा संपर्क अखंडपणे, सतत, आयुष्यभर चालू असतो. या वैश्विक शक्तीचे आपल्या शरीरातील महाद्वार आहे अनाहत चक्र याच्या माध्यमातून शरीरातील चैतन्याची मात्रा वाढविणे आणि स्वस्थ, आनंदी होणे हा साधकाचा उद्देश असतो. - - - - वायू. स्पर्श, त्वचा ज्ञान. अनाहत चक्र पकडणे फार सोपे नाही. चुकीचा ताण-दाब अयोग्य ठिकाणी दिला गेल्यास ते स्नायू पुढील चोविस तास दुखत राहतात. याचाच दुसरा अर्थ असा की योग्य पध्दतीने ताण-दाब दिल्यास ते ते स्नायू चैतन्याने प्राणशक्तीने सजग होतात. स्वस्थ होतात. अनाहत चक्राचे शरीरातील स्थान नक्की करणे व त्याचा वापर सूर्यनमस्कारामध्ये कसा होतो हे आपण बघणार आहोत. त्या अगोदर खाली दिलेल्या सूचना वाचा. प्रशिक्षण काळात आणि नंतरही सूर्यनमस्कार सराव करतांना त्या तंतोतंत पाळा. सूर्यनमस्कार एक साधना ४०