पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जादा ऊर्जा तयार झाल्याचे क्षेत्र (पित्त तत्त्वाचे क्षेत्र) हृदयापासून जवळ असेल तर (हृदयाचे) त्याचे पित्त संतुलित ठेवण्याचे काम सोपे होते. हे क्षेत्र जेवढे अधिक दूर असेल तेवढा हृदयावर अधिक ताण येतो. हृदयापासून दूर असलेल्या क्षेत्रामध्ये वारंवार सातत्याने जादा, अनावश्यक ऊर्जा तयार झाल्यास रक्ताभिसरण पूर्णक्षमतेने त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. पर्यायाने ऊर्जेचे संतुलन घडवून आणण्यास हृदय कमी पडते. त्या क्षेत्रामध्ये पित्ताचे वर्चस्व होते. त्या भागातील स्नायूमध्ये/अवयवांमध्ये वेदना लगेच सुरू होतात. हा प्रकार वारंवार घडला तर स्नायूंचा विकार सुरू होतो. त्या भागातील स्नायूकार्य क्षीण होते. स्नायूंच्या वेदना टाळण्यासाठी तसेच सूर्यनमस्कारात सातत्य राहण्यासाठी अनाहत चक्राकडे विशेष लक्ष द्यावयास हवे. सूर्यनमस्कारामधील सातत्य साधता आल्यास संपूर्ण आरोग्य, आत्मारामाचे राज्य, रामराज्य, स्वराज्य प्रत्येकाला सहज शक्य आहे. हे आत्मारामाचे स्थान नादरहित झाले, शांत झाले म्हणजे त्यातील 'राम' निघून जाणे, आपले अस्तित्व संपणे असा होतो. तक्ता क्रमांक बत्तीस अनाहत चक्र अनाहत चक्र आपल्या शरीरामध्ये 24 वैश्विक शक्तीचा प्रवेश, वायूच्या माध्यमातून, याच चक्रामध्ये प्रथम होतो. वैश्विक शक्ती / प्राणशक्ती म्हणजेच आत्माराम, परमेश्वर, अनाहत चक्र जेवढे महत्वाचे तेवढेच ते पकडायला अवघड. हे ऊर्जाचक्र पकडतांना दुसरीकडे ताण-दाब मिळाल्यास तो भाग दिवसभर दुखतो. याचीच दुसरी बाजू म्हणजे योग्य पध्दतीने या ऊर्जाचक्राचा वापर केल्यास त्याचे फायदे आपल्याला पुढे चोवीस तास मिळतात. याचे अधिष्ठान वायू. वायू शक्तीरुप आहे. सामर्थ्यवान आहे. अनाहत चक्र प्राणशक्तीचे स्थान आहे. वायू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनाला स्थिर करण्यासाठी साधना, जप, ध्यान म्हणजेच कार्यसिद्धीसाठी पुन्हा पुन्हा अथक प्रयत्न, यशदायी परमेश्वराचे 24 महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे। सौख्यकारी शोकहर्ता, धुर्तवैष्णव गायका || (श्री भीमरुती स्तोत्र) (श्रीहनुमान चालीसा) राम दुआरे तुम रखवारे, होत ना आज्ञा बिनु पैसारे । सब सुख लहैं तुम्हारी सरना, तुम रक्षक काहु को डरना।। सूर्यनमस्कार एक साधना ३९