पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक सूर्यनमस्कार घालतांना आपण तीन वेळा मणिपूरचक्राचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. हस्तपादासन करतांना दोन वेळा मणिपूरचक्राला सहज मिळालेला दाब हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा असतो. साष्टांगनमस्कारासन करतांना मात्र मणिपूर चक्राला प्रत्यक्षपणे ताण दिला जातो. हे शक्तीस्थान पकडणे सहज शक्य होते. त्याचा थोडा सराव करण्याचा प्रयत्न करू. मणिपूर चक्र स्थान निश्चिती मांडी घालून आरामत बसा. सरळ बसा. हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवा. हात गुडघ्यावर दाबा, खांदे वर उचला. संपूर्ण श्वास बाहेर सोडा. श्वास सोडतांनाच ओटीपोटापासून श्वासपटलापर्यंत पोट क्रमाने आत ओढा. नाभी प्रदेश आतमध्ये ओढून धरा. पोट पाठीला टेकविण्याचा प्रयत्न करा. 23 पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडा वेळ थांबा. नाभीवरील ताण काढून घ्या. स्नायू मोकळे होत आहेत त्याकडे लक्ष द्या. आराम स्थितीमध्ये बसा. अनाहत चक्र स्थान निश्चिती व महत्त्व तक्ता क्रमांक एकतीस महाबली मारुतीराय आपली छाती उघडतो आणि त्यामध्ये आपणाला प्रभु रामचंद्रांची प्रतिमा दिसते. हे चित्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. या चित्रावरून आपल्याला अनाहत चक्राचे महत्त्व स्पष्ट होते. कुठलाही आघात न करता हा नाद अखंडपणे आपल्या शरीरात चालू आहे. हा श्वासोच्छवासाचा नाद आपल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतो. अनाहत चक्र जप, तप, ध्यान, धारणा करण्यासाठी सर्वात सुरक्षित स्थान आहे. ज्या ठिकाणी आपले मन केंद्रित होते तेथे ऊर्जा म्हणजे शक्ती तयार होते. जादा तयार झालेल्या ऊर्जेला पित्ततत्त्व म्हणतात. ही जादा तयार झालेली ऊर्जा / उष्णता संतुलित ठेवण्याचा प्रयत्न हृदय लगेच सुरू करते. वात तत्त्वाची मदत घेऊन थंड प्रवृत्तीचे कफ तत्त्व त्या ठिकाणी घेऊन जाते, पित्ताला शमविण्याचा प्रयत्न करते. 23 मल-मूत्र विसर्जन या दोन्ही अवयवांचे स्नायू मोकळे ठेवा. त्यावर दाब देऊ नका. तेथील स्नायू पकडून ठेऊ नका. सूर्यनमस्कार एक साधना