पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चक्राचा रंग – कमळाप्रमाणे पांढरा. - चक्राचे स्थान कपाळावर दोन भुवयांच्यामध्ये. आकाश / मानस / चंद्रमा. चक्राचे अधिष्ठान शरीरावर परिणाम प्रभावित अवयव आज्ञाचक्र या मर्मबंधाला जगतज्योती, तिसरा डोळा ही इतर विशेषणे वापरली जातात. या ऊर्जाचक्राचा निर्देश ज्योत किंवा डोळा या प्रतिमेने केला जातो. हे ऊर्जाचक्र आपल्या शरीरातील प्राणतत्त्वाचा स्वीकार करणारे केंद्र आहे. प्राणवायू हा अग्नीचे प्रतिक आहे. कारण एका वाचून दुसऱ्याचे अस्तित्व शक्य नाही. सौम्य प्रमाणातील प्राणतत्त्वावर आपले जीवन अवलंबून आहे. शरीरात अग्नीतत्त्व नाही म्हणजे ते थंड पडते. शरीराचे अस्तित्व संपते. पाण्यातून बाहेर काढलेला मासा तडफडून मरतो. कारण त्याच्या शरीराला तीव्र स्वरुपातील अग्नीतत्त्व सहन होत नाही. - - - विचार पद्धती, विचारांचा आवेग. बुद्धी, मन. सूर्यनमस्कार सरावास सुरुवात केल्यावर अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला या साधनेची प्रचिती येते. शरीराला दिलेला ताण-दाब जाणवतो. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा/शक्तीचा शरीर स्तरावर अनुभव येतो. अर्थात हाच परिणाम मन आणि बुद्धीवरसुद्धा झालेला असतो. पण त्याचा अनुभव लगेच जाणवत नाही. आज्ञाचक्राच्या माध्यमातून मन आणि बुद्धीवर हा परिणाम होत असतो. हे शक्ती स्थान कार्यरत करण्यासाठी प्रत्येक सूर्यनमस्कारात तीन वेळा आपण प्रयत्न करतो. अश्वसंचालनासन करतांना दोनदा व बारावी शरीरस्थिती (प्रणामासन + नमस्कार मुद्रा) करतांना एकदा. ही शरीरस्थिती करतांना आज्ञाचक्राकडे मन एकाग्र करा. जप, तप, ध्यान, धारणा, पूजा-अर्चा या मानसिक साधनेचा उपयोग यास पूरक आहे. सहजयोग साधना, विपश्यना, क्रियायोग वगैरे अनेक साधना हे चक्र कार्यरत सूर्यनमस्कार एक साधना विशुद्धचक्र स्वाधिष्ठानचक्र आज्ञाचक्र अनाहतचक्र → मणिपूरचक्र ३५