पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होण्यासाठी उपयुक्त आहेत. मानसिक साधना व कायिक साधना एकमेकास पूरक आहेत. यातूनच शरीर-मन-बुद्धी एकत्रितपणे 'मी'चा शोध घेण्याच्या कामाला लागतात. तुमचे अंतर्मन नेहमी काहीतरी सूचना, संदेश, संकेत देत असते. पण 'मी' या संकेतांशी सहमत होत नाही. दोघांमध्ये सारखे द्वंद सुरू असते. या सूचना आपण स्वीकारत नाहीत. अपयश आल्यावर ही चूक लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेली असते. या आज्ञाचक्राची प्रगती तीन टप्प्यांमध्ये विभागता येईल. आपणाला योग्य-अयोग्य, श्रेयस-प्रेयस असणारे आज्ञा-संकेत कोणते हे समजणे, त्यातील योग्य संदेश आत्मारामाचा आदेश म्हणून स्वीकारणे, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग ही आज्ञा म्हणजे ईश्वराने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आहे. हा आदेश प्रत्यक्षात आणणे. त्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करणे. त्याने दिलेल्या सर्व क्षमतांचा जीवे - भावे पुरेपूर वापर करणे हे त्याने सोपविलेले आहे. यश येणारच. 21 चांगल्या कार्याचा संकल्प हाच साधकाला अंतिम यशापर्यंत घेऊन जातो. कारण साधक हे ब्रह्मकर्म परमतत्त्वाच्या प्रेरणेने त्याने दिलेल्या क्षमतेमुळे करत असतो. परमेश्वर हे कार्य आपल्याकडून करून घेतो आहे ही त्याची मनोभावना असते. म्हणून हे यश, संकल्पपूर्ती त्याची त्याला म्हणजे संपूर्ण विश्वाला मनो-भावे अर्पण करणे हेच आपले अंतिम यश. या अंतिम यशाचे समाधान हाच आपल्याला मिळालेला परमेश्वराचा प्रसाद होय. सूर्यनमस्कार साधनेतील प्रणव, श्लोक, मंत्र वगैरे आपले मन शांत व होतो. त्याचे माकडचाळे थांबल्यामुळे त्याला विश्रांती मिळते. मानसिक ताण- तणाव थोडावेळ का होईना दूर राहतात. मन एकाग्र होते. एकाग्र झालेल्या मनाचे मन:सामर्थ्य अमर्याद असते. या मन:सामर्थ्याचा वापर बुद्धी करून घेते. 'स्व'चा शोध घेण्यास सुरुवात करते. जेव्हा 'स्व' आणि 'सामर्थ्य' म्हणजेच शीव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण जे का , 21 आपण केलेला सत्यसंकल्प ब्रह्मकर्म स्वरुपाचा असतो. तो पूर्ण करण्याची जबाबदारी विश्वदेव घेतो आणि त्याचे पुण्य आपल्या पदरात टाकतो. म्हणूनच पूण्यकर्म अविनाशी असते. पाप क्रिया किंवा केलेली चूक ही भोगून संपणारी असते. सूर्यनमस्कार एक साधना