पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. आपण या शक्तींचे अस्तित्व मान्य करतो. या शक्तीपुढे नतमस्तक होतो. विश्वोत्पत्तीचे मूलतत्व जे आहे त्याचेच हे वेगवेगळे अवतार आहेत. वैश्विक शक्तीचीही अनेक रूपे आहेत. या विष्णू शक्तीचा किंवा विष्णू तत्त्वाचा वापर आपल्याला सूर्यनमस्कारमध्ये करायचा आहे. शरीरातील ९५% पेक्षा अधिक स्नायू सूर्यनमस्कारामध्ये कार्यरत करावयाचे आहेत. शरीरामधील अवकाश व बाहेरील अवकाश यांचा योग घडवून आणायचा आहे. शरीरामध्ये असलेल्या चैतन्याला अधिक प्रमाणात वैश्विक शक्तीचा पुरवठा करून प्रत्येक पेशी आतून, गर्भातून सशक्त करायची आहे. एखादे अंडे बाहेरून फोडले तर ते नष्ट होते. पण तेच अंडे आतून फुटले, उबवले तर त्यातून 20 जीव निर्माण होतो. याच पध्दतीने सूर्यनमस्कारात शरीरातील पेशी सशक्त होतात व चैतन्याचे स्फुरण वृद्धिंगत होते. आपल्याला आरोग्य व आनंद याची प्रचिती येते. यानंतर आपण शरीरातील ऊर्जाचक्र कोणते, त्यांचे शरीरातील स्थान, त्यांचे महत्त्वाचे कार्य, ते पकडायचे कसे, त्यांचा सूर्यनमस्कारामध्ये वापर कसा करायचा याकडे लक्ष देणार आहोत. शरीरामधील ऊर्जाचक्र तक्ता क्रमांक अठ्ठावीस पंचज्ञानेन्द्रिये व पंचकर्मेन्द्रिये ही आपल्या शरीराची बाह्य इंद्रिये आहेत. ते कार्यतत्पर राहण्यासाठी त्यांच्या अंतर्गत काही सूक्ष्म प्रणाली किंवा अवयव आहेत. हे सूक्ष्म अवयव बाह्य अवयवांना कार्यरत राहण्यासाठी उत्तेजन देतात. त्यांना ऊर्जा देतात. ही शक्ती त्यांना ऊर्जाचक्राकडून मिळते. म्हणूनच शरीरातील ऊर्जाचक्रे त्या त्या भागातील अवयवांची शक्ती केंद्रे आहेत असे म्हटले जाते. प्रत्येक ऊर्जाचक्र त्याच्या अखत्यारीतील सर्व अवयवांचा आधार आहे. त्या क्षेत्राचा अधिपती आहे. खांब ज्याप्रमाणे इमारतीला आधार देतो त्याप्रमाणे ऊर्जाचक्र त्या त्या अवयवांचे अधिष्ठान आहे. खांब स्तब्ध आहे, शांत आहे. तो 20 साधारणपणे शंभर दिवसांमध्ये आपल्या शरीरातील सर्व रक्त पेशी नव्याने तयार झालेल्या असतात. यालाच चयापचय असे म्हणतात. यातून पेशींची संख्या वाढ व शक्ती वर्धन होत असते. सूर्यनमस्कार एक साधना ३३