पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नावाने संबोधतात. 18 विस्फारणे व पुन्हा मूळ स्थितीला येणे हे प्राणतत्त्वाचे वैशिष्ट्य. प्रत्येक पेशीचा आकार वाढणे कमी होणे, उभारून येणे खाली बसणे हे शरीरातील चैतन्य आहे. प्राणतत्त्व आहे. या चैतन्याची हालचाल आपल्याला स्पष्ट अनुभवता येते. शरीरातील सतत चाललेल्या या क्रियेचा मूळ गाभा प्रत्येक स्नायूपेशींमधील अवकाश पोकळी आहे. शरीरातील या अवकाशाचा संयोग बाहेरील अवकाशाशी झाला म्हणजे ही स्पंदने उत्पन्न होतात. घटाकाश व आकाश एकत्र आल्यावर शक्तीची निर्मिती होते. यालाच वैश्विक शक्ती किंवा प्राणतत्त्व म्हणतात. हेच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. हे शरीरात व वातावरणात सर्व ठिकाणी भरून उरलेले आहे. तेच अंतिम सत्य आहे. शाश्वत तत्त्व आहे. इतर सर्व मिथ्या आहे. कारण हे परमतत्त्व सोडून इतर सर्व परिवर्तनशील आहे. सूर्यनमस्कारास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणतो. ध्येय सदा सवितृ 19 मंडल मध्यवर्ती । प्रत्येक पेशीच्या मध्यवर्ती भागात हे चैतन्य आहे आणि त्याची आराधना/साधना आपणाला करायची आहे. विष्णू किंवा विष्णूशक्ती या शब्दाचा अर्थ आपण बघितला. जी सदा सर्वकाळ सर्व ठिकाणी पूर्णांशाने एकाचवेळी उपस्थित असते. हीच ती वैश्विक शक्ती, विष्णूतत्त्व किंवा सूर्यतेज जे प्रत्येक पेशीच्या मध्यवर्ती असते. पेशींचे आत्म तत्व असते. पेशींचे संचलन करणारे असते. म्हणून आपण म्हणतो 'सूर्य आत्मा जगत स्तस्थुषश्च' - ऋग्वेद, यजुर्वेद चुंबकीय शक्ती, विद्युतशक्ती, अग्नीशक्ती, जलशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती दृष्य स्वरूपात बघता येत नाही. ती काही वस्तू नाही. तिला आकार नाही, चव नाही, रंग नाही, गंध नाही आणि वजनही नाही. मात्र प्रत्येक शक्तीचे सामर्थ्य अनुभवाला येते. त्याची प्रचिती येते. प्रत्येक शक्तीचे कार्य अचाट आहे, अफाट 18 शरीरातील प्राणतत्त्व म्हणजे आपल्याला सदैव जाणवणारे चैतन्य किंवा उत्साह, शोक, चिंता, काळजी, भिती यामुळे आपला उत्साह कमी होतो. हा कमी झालेला उत्साह पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शरीर यंत्रणेला खूप प्रयास पडतात. मन मात्र हे मृगजळ सोडण्यास तयार नसते. मृगजळ व दमछाक सातत्याने चालूच असते. त्यातूनच सर्वरोग-व्याधी - विकास सुरू होतात. म्हणून आपण म्हणतो 'उत्साह हेच जीवन, निरुत्साह हेच मरण. 19 संदर्भ घ्या. उत्तरार्ध शंका समाधान. सूर्यनमस्कार एक साधना ३२