पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असते. हातावर जी स्पंदने जाणवली ती म्हणजे चैतन्यस्वरूपाचा प्रवाह. त्यातून जे चुंबकिय आकर्षण निर्माण झाले ते शक्तीचे एक रूप आहे. एक शिव आहे, शाश्वत आहे दुसरे शक्तीचे एक रूप आहे. + ज्या वेळेला शीव आणि शक्ती यांची युती होते तेव्हा आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा सफल होतात. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या या क्षर-अक्षर प्रकृतीला अनेक संबोधने आहेत. ते अध्यात्मिक शास्त्र व भौतिकशास्त्र यामध्ये सापडतात. विश्वोत्पत्तीचे मूलतत्व निर्देशक संबोधने तक्ता क्रमांक सव्वीस - सूर्यतेज, आदिशक्ति, प्राणशक्ती, आत्माराम, जगतज्योती, चैतन्य, + वैश्विक शक्ती, चैतन्यशक्ती, वैष्णव- वैष्णवी, पुरुष-प्रकृति, ब्रह्म - माया, जीव-परमात्मा, क्षेत्र-क्षेत्रज्ञ, शिव-शक्ति, चंद्र-सूर्यनाडी, चुंबकाचे दोन ध्रुव, धन-ऋणविद्युतभार, तक्ता क्रमांक सत्तावीस स्नायूपेशींचे स्फूरण समर्थ रामदास स्वामी या परम तत्त्वाला आत्माराम किंवा जगतज्योती या - ग्रंथराज दासबोध समास ७ दशक ४ यामध्ये विमळब्रह्म निरुपण आहे. ते वाचा. इतर समासामध्ये याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आलेला उल्लेख बघा. ब्रह्मतत्व/अध्यात्म समजणे सोपे होईल. सूर्यनमस्कार एक साधना ३१