पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केला. या क्रियेच्या माध्यमातून आपण सूर्यनमस्काराचे एक महत्त्वाचे तत्त्व अनुभवले. हे तत्त्व आहे ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. प्राणशक्ती तयार होते. ही प्राणशक्ति म्हणजेच आत्मतत्त्व ते नेहमी स्फूरण पावणारे आहे. हृदयाची कार्यप्रवृत्ती कॅमेऱ्याने चित्रित केली तर स्नायूंचे अकुंचन-प्रसरण प्रकर्षाने जाणवते. शरीरातील सर्व अवयवांमध्ये त्यांच्या प्रत्येक स्नायूमध्ये, स्नायूंच्या प्रत्येक पेशीमध्ये, पेशींच्या प्रत्येक अणूरेणूमध्ये, अणूरेणूंच्या गतीला वाव देणारे अवकाश यामध्ये ही प्राणशक्ती आहे. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून प्रत्येक पेशीमधील ही प्राणशक्ति, सूर्यतेज वृद्धिंगत होते. स्फुरण पावण्याची क्रिया कसदार होते. प्रत्येक पेशीची लवचिकता सुधारते. सूर्यनमस्कार करतांना प्रत्येक पेशीखालून वर किंवा वरून खाली दाबली जाते. याचप्रमाणे ताणही दोन प्रकारे दिला जातो. ज्या स्नायूंना ताण- दाब नाही ते स्नायू पूर्णपणे शांत शिथील असतात. शरीरातील संपूर्ण पेशींना ही 16 पाच प्रकारची ताणस्थिती प्रत्येक सूर्यनमस्कारात अनेकवेळा दिली जाते. आपल्या हातावर जाणवलेली ही कंपने सजिव-निर्जिव, चल-अचल सृष्टीमध्ये सर्वत्र एकच आहे. प्रत्येक कंपन हे अल्प काळ टिकणारे आहे. ते अस्थायी स्वरूपाचे तसेच परिवर्तनशील आहे. 17 पण या कंपनांचा स्त्रोत मात्र अनादी आहे, अखंड आहे, अपरिवर्तनीय आहे. या अनादी तत्त्वाला / शक्तीला परमईश्वर, भगवान, गॉड अशा अनेक नावांनी ओळखले जाते. जे परिवर्तनशील आहे ते नष्ट होणारे असते, मर्त्य असते. पण जे अपरिवर्तनीय, अखंड, अनादी आहे ते अमर असते, कालविरहित असते. प्राणतत्त्व / चैतन्य / वैश्विक शक्तीचा स्त्रोत अनादी कालापासून अखंड आहे पण त्या शक्तीचे रूप - स्वरूप बदलत 16 बारा आसन असलेल्या गतीयुक्त सूर्यनमस्कारामध्ये शरीरामधील सर्व पेशींना हे पाच प्रकारचे ताण-दाब चार वेळेस मिळतात. दिलेल्या दाबामुळे विजातीय, अनावश्यक द्राव बाहेर पडतात आणि ताणामुळे शक्ती वर्धन होते. 17 भौतिक शास्त्राचा सिद्धांत आहे शक्ती रुपांतरित करता येते. ती नष्ट करता येत नाही. अध्यात्म सांगते पूण्यकर्माचे सामर्थ्य नष्ट होत नाही. पापकर्म मात्र कर्मभोग भोगून संपते. सूर्यनमस्कार एक साधना ३०