पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता या साखळीतील शेवटची कृती. नमस्कार स्थितीतील हात दोन / तीन इंच दूर करा. परत जवळ घ्या. दोन्ही तळवे गालावर व बोटे कपाळावर येतील असे ठेवा. किंचित दाबल्यासारखे करा. डोळ्यावर दाब येणार नाही याकडे लक्ष द्या. हातावर गोळा झालेली उर्जा जेथून मिळाली त्या स्त्रोताकडे परत संक्रमित करा. हात खाली घ्या. आरामात बसा. कोणती संवेदना जाणवली ? हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी ही कृती मन लावून चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला दोन्ही हातावर चुंबकीय आकर्षण कमी अधिक प्रमाणात जाणवलेले आहे. हातावर जाणवलेले चुंबकीय क्षेत्र कशामुळे निर्माण झाले ? हातावर विशिष्ट पध्दतीने 15 दाब दिल्यामुळे तेथे ऊर्जा निर्माण झाली. त्या ऊर्जेमध्ये असलेल्या चुंबकीय शक्तीची प्रचिती हातांच्या तळव्यांवर आली. आपण कुठे कुठे दाब दिला ? आपण हातांची सर्व बोटे, तळवे, मनगट, हात, कोपर, दंड, खांदे, छाती या अवयवांवर दाब देण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या दाबाचा परिणाम कोठपर्यंत पोहोचला ? आपण दिलेला हा दाब त्या त्या अवयवांच्या स्नायुंना, स्नायुंच्या पेशींना, पेशींच्या अणुला, अणुच्या रेणू-परमाणूंना आणि रेणू-परमाणूंना अणू भोवती प्रदक्षिणा घालण्यास जो अवधी लागतो त्या पोकळीपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्न केलेला आहे. ही कृती करतांना शारीरिक क्षमतेला आणखी कोणाची मदत झाली ? ही कृती यशस्वी होण्यासाठी आपण शारीरिक व मानसिक क्षमतेचा वापर 15 सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक स्नायूपेशींवर दिलेला हा दाब अधिक प्रभावी असतो. दाबाची तीव्रता व दाब प्रदेश दोन्हीमध्ये वाढ झालेली असते. या दाबामुळे पेशीमध्ये असणारे विजातीय (अनावश्यक) द्राव बाहेर टाकले जातात. त्यानंतर पेशिंना आलटून पालटून दिलेला ताण हा त्यांची लवचिकता वाढविणारा असतो. त्यांच्यासाठी शक्तीवर्धक असतो. सूर्यनमस्कार एक साधना २९