पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणूनच ज्ञान मुद्रा असेही म्हणतात. ॐ एक ते दहा पर्यंत मोजणे झाले असल्यास दाब हळूच काढून घ्या. आता दाबाची दिशा बदला. अंगठ्याने तर्जनीवर दाब देण्यास सुरुवात करा. हळूहळू दाब वाढवा. वेळ मोजणे संपल्यावर दाब हळूच काढून घ्या. अंगठा मधल्या बोटावर ठेवा. अंगठ्याने मोठे बोट पक्के दाबून धरा. आकाश तत्त्व व अग्नी तत्त्व एकत्र आणा. आतमध्ये रबराच्या नळ्या आहेत. त्या दोन्ही बाजुंनी बंद आहेत. त्या पाण्याने भरलेल्या आहेत. आपण त्यावर दाब देतो आहे. ही संवेदना आपल्याला जाणवते. 13 हा दाब कुठे सरकतो त्याचा मागोवा घ्या. वेळ संपल्यावर दाब काढून घ्या. अंगठा अनामिकेवर जोरात दाबून धरा. अग्नी तत्त्व व पृथ्वी तत्त्व चिमटीमध्ये पक्के पकडा. दाबाचा पाठलाग करा. सुरुवातीला तो फक्त बोटांच्या टोकांवर जाणवतो. हळूहळू तो बोटे, पंजा, मनगट, हात, कोपर, दंड, खांदे, छाती याकडे सरकतो आहे त्याकडे लक्षात द्या. आता पाळी करंगळीची. अग्नी तत्त्व व जल तत्त्व चिमटीमध्ये पक्के पकडण्याचा प्रयत्न करा. दहा सेकंदानंतर दाब काढून घ्या / आता दोन्ही हात छातीवर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. सर्व बोटांचे पहिले पेर एकमेकांवर पक्के दाबून धरा. 14 संपूर्ण लक्ष छातीकडे ठेवा. सर्व बोटांचे मधले पेरे एकमेकांवर पक्के दाबून धरा. सर्व बोटांचे तिसरे पेर व दोन्ही अंगठ्यांचे दोन्ही पेर एकमेकांवर पक्के दाबून धरा. संपूर्ण पंजा एकमेकांवर पक्का दाबून धरा. संपूर्ण लक्ष छातीकडे ठेवा. तळव्याच्या मध्यभागी थोडी हवा शिल्लक राहिली असण्याची शक्यता आहे. तळव्याचा मधला भाग दाबून आतील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष छातीकडे ठेवा. तळव्याचा मूळ भाग (शेवटचे टोक) एकमेकांवर पक्के दाबा. सूंपर्ण लक्ष छातीकडे ठेवा. 13 शरीरक्रियेला मनाची साथ देण्याचा प्रयत्न सुरू झाला. 14 शरीर-मन- ऊर्जाचक्र यांचा त्रिवेणी संगम सुरू झाला. सूर्यनमस्कार एक साधना २८