पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणूनच आयुर्वेद शास्त्र यांना परमतत्त्व, परमेश्वर, भगवान अशा नावाने संबोधते. हे शरीर पंचमहाभूतांचे आहे. त्यांच्यापासून निर्माण झालेले आहे. त्यांच्यातच विलीन होणार आहे. या पाचतत्त्वांचे शरीरामधील संतुलन म्हणजेच आपले संपूर्ण (कायिक-वाचिक-मानसिक) आरोग्य. सूर्यनमस्कार साधनेतून आपण प्राणतत्त्वाचा उपयोग आरोग्य व आनंद संवर्धनासाठी काही प्रमाणात करू शकतो. यामुळे आपण तीनही तापातू अध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक मुक्त होऊ शकतो. करन्यास कृती - तक्ता क्र. पंचवीस शरीरातील प्राणतत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आपण करन्यासाची कृती करणार आहोत. यामध्ये दोन्ही हातांचा वापर करा. आपले संपूर्ण लक्ष कृतीवर केंद्रित करा. कोठे काय संवेदना होतात त्याकडे लक्ष द्या. त्या संवेदनांचा मागोवा घेत त्यांच्याबरोबर पुढे सरकत रहा. प्रत्येक कृती साधारणपणे दहा सेकंद करावयाची आहे. हा वेळ मोजण्यासाठी ॐ एक, ॐ दोन, ॐ तीन दहापर्यंत मनात मोजा. करन्यासाची शेवटची कृती झाल्यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. शेवटची कृती आहे - नमस्कार स्थितीमधील दोन्ही हात दोन- तीन इंच दूर करणे, पुन्हा जवळ आणणे. प्रश्न आहे दोन्ही हातावर कोणती संवेदना जाणवली? प्रश्नाचे उत्तर बरोबर येण्यासाठी संपूर्ण लक्ष कृतीकडे ठेवा. - .... डोळ्यावर चष्मा असल्यास काढून ठेवा. आरामात बसा. ताठ बसा. पाठीचा मणका सरळ ठेवा. हात गुडघ्यावर ठेवा. पंजा वरील दिशेला. अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या पहिल्या पेराच्या टोकावर गोलाकार फुगवटा आहे. ते दोन्ही उंचवटे ( अंगठा व तर्जनीच्या) चिमटीमध्ये पकडा. तर्जनीने अंगठा पक्का दाबून धरा. अंगठा अग्नी तत्त्व व तर्जनी वायू तत्त्व अग्नी म्हणजे प्रकाश, ज्ञान- विज्ञान - शहाणपण. वायू म्हणजे चंचलता, अस्थिरता, निर्णय क्षमतेचा अभाव, दोलायमान असणे. अग्नी तत्त्वाने वायु तत्त्वाला काबूत ठेवायचे आहे. या मुद्रेला सूर्यनमस्कार एक साधना २७