पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचप्राण : ही पाचही बोटे म्हणजे पंचप्राण. अंगठ्यापासून कनिष्ठिकापर्यंत क्रमाने 12 प्राण, अपान, व्याप, उदान, समान. - प्राणांचे स्थान : पंचप्राणांच्या शरीरातील स्थान क्रमशः प्राण (छाती), अपान (नाभीच्याखाली), व्यान (सर्व शरीर), उदान (तोंड, डोळे), समान (पोट) ऊर्जाचक्र : ही पाचही बोटे म्हणजे पाच ऊर्जाचक्रे अंगठ्यापासून कनिष्ठिकापर्यंत क्रमाने-अनाहतचक्र, स्वाधिष्ठानचक्र, विशुद्धचक्र, आज्ञाचक्र, मणिपूरचक्र. तीन दोष : अंगठा - पित्त दोष, तर्जनी व मध्यमा वाता दोष, अनामिका व कनिष्ठिका कफा दोष. - तीन गुण : अंगठा रजोगुण, तर्जनी व मध्यमा कनिष्ठिका तमोगुण प्रेरक आहे. - - - तक्ता क्र. तेवीस, चोवीस दाबबिंदुशास्त्र दाबबिंदुशास्त्र: आपल्या दोन्ही हातांच्या पंज्यावर असलेले सर्व दाबबिंदु पायाच्या तळव्यावरही आहेत. आपण या दाबतंत्राचा उपयोग करणे बंदच केले आहे असे म्हणावे लागेल. पायात जोडे व हातात यंत्र यामुळे हे दाबबिंदू प्रभावीपणे कार्यरत होत नाहीत. प्राण्यांच्या अंगावरही हे दाबबिंदू आहेतच. ते मात्र त्यांचे दाबबिंदू प्रकर्षाने सातत्याने वापरत असतात. आपणही हा वापर सुरू केल्यास लगेच दुसऱ्या दिवशी आरोग्य संवर्धनाची प्रचिती येते. एक्युप्रेशर ही एक सर्वमान्य उपचार पद्धती आहे. त्याचाही वापर सूर्यनमस्कारामध्ये होतो. तो कसा होतो ते नंतर पाहू. सत्वगुण, अनामिका व 12 हृदिप्राणो वसेनित्यम् अपानोगुह्यमंडले। व्यानोव्यापी शरीरे तु प्रधानाः पंचवायवाः।। सूर्यनमस्कार एक साधना आपल्या शरीरामध्ये दहा प्रकारचे वायू व तेरा प्रकारचे अग्नी आहेत. वायूमध्ये पंचप्रमाण व अग्नींध्ये जठराग्नी फारच महत्त्वाचे आहेत. प्राणतत्त्वामुळे आपले अस्तित्व निश्चित होते. अग्नीमुळे आपले आयुष्य पुढे सरकते. आपले शरीर उबदार नसेल तर आपण थंड पडतो. आपले असणे संपते. वायू व अग्नी आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहेत. ते आपल्या शरीरात आहेत म्हणून त्यांना आपले म्हणायचे एवढेच. त्यांच्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. गोरक्ष संहिता ३० २६