पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महत्वपूर्ण आहे. सूर्यनमस्कार हा नित्यकर्मांतर्गत प्रकारातील धार्मिक विधी आहे. करन्यासातून आपण शरीरातील प्राणतत्त्वाची अनुभूती घेता येते कां ते बघू. कर या शब्दाचा अर्थ हात आणि न्यास म्हणजे स्थापन करणे. आपल्या शरीरात वैश्विक शक्तीची, दैवी गुणांची स्थापना करणे हे या विधीमध्ये अभिप्रेत आहे. आपल्या पाच बोटांवर पाच दैवते आणि तळहातावर तीन दैवते म्हणजेच आठ दैवी गुणांची स्थापना करायची आहे. ते आहेत गोविंद, महिधर, ऋषिकेश, त्रिविक्रम, विष्णु, माधव, नारायण, जनार्दन या देवतांची नावे त्याच्या दैवी गुणसमुच्चयाचा निर्देश करतात. आपल्या हातांची बोटे पंचमहाभूते, पंचप्राण, पाचउर्जा चक्रे, त्रिगुण ( सत्त्व - रज - तम), त्रिदोष ( वात- - कफ-पित्त) याचे प्रतिनिधित्व करतात. करन्यास श्लोक 11 आपले दोन्ही हात म्हणजे देवतांचे अधिष्ठान आहे. या श्लोकामध्ये हातावर असलेल्या - - देवता सांगितलेल्या आहेत. करन्यास अर्थ व महत्व अंगुष्ठाग्रे तु गोविंदं तर्जंन्यांच महीधरम् । मध्यमायात हृषिकेशं अनामिक्यां त्रिविक्रमम् । कनिष्टिक्यां असेद विष्णुं करमध्ये तू माधवम्। करपृष्ठे हरिं विद्यात् करमुले जनार्दनम्। एवं विध: करन्यासः सर्वपाप प्रणाशन: ।। देवता : अंगठ्यापासून कनिष्ठिका पर्यंत क्रमश: गोविंद, महिधर, ऋषिकेश, त्रिविक्रम, विष्णु, करमध्य माधव, करपृष्ठे नारायण, करमुल - जनार्दन. पंचमहाभुते : आपल्या हातांची पाचही बोटे म्हणजे पांच मूलतत्त्वे अंगठ्यापासून कनिष्ठिकापर्यंत क्रमश: अग्नीतत्त्व, वायूतत्त्व, आकाशतत्त्व, पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्व. 11 दाबबिंदू शास्त्र (Acu Pressure / Puncture) करन्यासाचा विस्तार आहे. सूर्यनमस्कार एक साधना २५