पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तक्ता क्र. वीस, एकवीस, बावीस या प्राणतत्त्वाने आपले संपूर्ण शरीर व्यापलेले आहे. ते आपल्या प्रत्येक अवयवांमध्ये आहे, प्रत्येक अवयवांच्या पेशीमध्ये आहे, प्रत्येक पेशीमधील अणूमध्ये आहे, प्रत्येक अणूभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या रेणूंमध्ये आहे आणि रेणूंना प्रदक्षिणा घालण्यासाठी जे अवकाश लागते त्याच्यामध्येही आहेच आहे. हे प्राणतत्त्व आपल्या प्रत्येक क्रियेचं संचलन करते. याच्या असण्यावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. या प्राणतत्त्वाची तीव्रता किती प्रमाणात आपल्या शरीरात आहे. यावर आपले आरोग्य अवलंबून असते. हे प्राणतत्त्व आपल्या शरीरामध्ये आहे कां, असल्यास किती प्रमाणात आहे याची प्रत्यक्ष अनुभूती शरीर स्थरावर मिळते का यासाठी प्रयत्न करू. - लहान मुलांमध्ये हे प्राणतत्त्व / सूर्यतेज खूप प्रमाणात आणि तीव्र स्वरूपाचे असते. या प्राणतत्त्वाचे वैशिष्ट्य बघायचे झाल्यास एखाद्या बालवाडीत मधल्या सुटीमध्ये पटांगणात थोडा वेळ थांबा. लगेच तेथून निघा आणि एखाद्या रुग्णालयाला भेट द्या. सूर्यतेजाची, प्राणत्त्वाची तीव्रता कमी अधिक असल्यामुळे या दोन्ही वातावरणामध्ये जमिन अस्मानाचा फरक जाणवतो. उत्साह - चैतन्य - आनंद म्हणजेच प्राणतत्त्व - सूर्यतेज- आत्माराम होय. पाळण्यात असलेले मूल आनंद व्यक्त करतांना घशातून मजेशीर आवाज काढते. त्याचे आजोबा, ज्यांच्या तोंडाचे बोळके झालेले आहे, तेसुद्धा याच पध्दतीचा आवाज काढून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. साधुसंत, महात्मे यांच्या चेहऱ्यावर शांतीसमाधानाचे तेज असते. या तेजासमोर आपण नतमस्तक होतो. आपल्या दंडामध्ये बेटकुळी असते. झुरळ मेल्यावर अर्ध्या तासात त्याला मुंग्या ओढून नेतात. हा सर्व परिणाम प्राणतत्त्व असणे व नसणे याचा आहे. हे प्राणतत्त्व, सूर्यतेज, प्राणशक्ती काय आहे त्याचे प्रत्यक्ष ज्ञान घेऊ, त्याची अनुभूती शरीरावर मिळते किंवा नाही हे बघू. या प्राणशक्तीचा वापर करून आपले आरोग्य व आनंद वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करू. प्रत्येक धार्मिक विधी करन्यासाने सुरू होतो. हा करन्यास फार सूर्यनमस्कार एक साधना २४