पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 दोघांमध्ये समेट झाला. दिलजमाई झाली. १ आपल्या जखमांवर दोघांनी तेल लावले. गरम पाण्याने स्नान केले. रुईची पाने वापरली. स्नायू मोकळे केले. वेदना घालविल्या. पुरणपोळी, उडदाचे वडे, दही, मिठाई यावर यथेच्छ ताव मारला. त्या दिवसापासून शनिदेवाला आपल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी फक्त शनिवारीच शनी आणि मारूती दोघांना 10 तेल व रुईची पाने अर्पण केली जातात. कथाबोध प्रत्येकाला ठराविक काळानंतर साडेसाती सुरू होते. त्यावेळी मारुतीची उपासना करण्याचा सल्ला मिळतो. शक्तीउपासना बलोपासना न करणाऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना असते. जागे व्हा. सूर्यनमस्कार घाला. धोक्यातून बाहेर पडा हा संदेश असतो. हा संदेश आपल्याला दर शनिवारी मिळतो. तसेच आदितवार म्हणजे आदित्याचा दिवस म्हणजेच रविचा दिवस, सूर्याचा दिवस. त्यादिवशीही हाच संदेश मिळतो. या संदेशाचा स्वीकार आपण करतो. पण त्याची अंमलबजावणी मात्र अयोग्य पद्धतीने करतो. आपल्याला अपेक्षित असलेला लाभ होत नाही. त्यामुळे आपले शक्तीकवच, सूर्यकवच वेगाने क्षीण होते. आजपासून हे सूर्यकवच मजबूत करायचे आहे. सूर्यनमस्काराच्या ऊर्जेमध्ये शरीराचे हे मडके दररोज पक्के भाजून घ्यायचे आहे. सूर्यनमस्काराचे आधार वाक्य किंवा अधिष्ठान कोणते याचा स्पष्ट उल्लेख असलेला श्लोक, स्तोत्र किंवा संहिता माझ्या वाचनात नाही. मात्र सूर्योपासनेचे इतर प्रकार लक्षात घेतले तर हे अधिष्ठान प्राणतत्त्वाचे वैश्विकशक्तीचे आहे हे सहज लक्षात येते. आपल्या शरीरातील प्राणतत्त्वाचा वापर करून आरोग्य व आनंद वृद्धिंगत करणे हे सूर्यनमस्काराचे आधार वाक्य आहे. कीलकं आहे. 9 बुधवार हा मारुतीचा वार, शनिवार शनिचा. या दोन दिवशीच फक्त तेल उटणे लाऊन आंघोळ करण्याचा प्रघात आहे. इतर दिवशी अभ्यंगस्नान करू नये असे शास्त्र सांगते. 10 रुईचे संस्कृत नाव आहे कनक. कनक म्हणजे सोने. कनकासव हे एक आयुर्वेदाचे औषध. खोकला, कफ, एलर्जिक दमा, अस्थमा यावर उत्तम औषध. सूर्यनमस्कार एक साधना २३