पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत शक्ती, सामर्थ्य, प्राणशक्ती. या प्राण शक्तीवर आपले जगणे अवलंबून असते. यामुळेच आपण आरोग्यपूर्ण व आनंदी आयुष्य जगू शकतो. जर आपण वीर हनुमंताची उपासना केली, शक्तीउपासना केली, सूर्यनमस्कार दररोज घातले तर आपले सर्व रोग व्याधी विकार, व्यसन दूर होतात. आपल्या साधकाला भयमुक्त करण्यासाठीच मार्तंडवंशावतंस प्रभुरामचंद्रांनी हनुमंताला चिरंजीवपद बहाल केलेले आहे. बोधकथा वीरमारूती म्हणजे शक्ती सामर्थ्याचे प्रतिक मारुती हा वायुपुत्र तो अकरावा मरुत आहे. वायू या शब्दाला समानार्थी शब्द आहेत शक्ती, मन, विष्णू (वैश्विकशक्ती) प्राणतत्व इत्यादी. एकदा मारुतीराय आपल्या उद्योगात मग्न होते. तो दिवस शनिवारचा होता. तेथे शनिमहाराज आले. 8 हे यमाचे धाकटे बंधू. प्राणिमात्रांना शासन करण्याचा यांचा गुणधर्म यांचे सामर्थ्य अफाट यांच्या तावडीतून आजपर्यंत कोणीच सुटला नाही, कोणी सुटू शकणारही नाही. अशा या शनिमहाराजांनी शांत बसलेल्या मारुतीरायांची खोड काढली. ध्यानीमनी नसतांना कामातील हा व्यत्यय मारुतीरायांना आवडला नाही. 'मला त्रास देऊ नकोस' अशी त्यांनी शनिमहाराजांना विनंती केली. शनिमहाराजांनी हनुमंताचे ऐकले नाही. पुन्हा खोडी काढली. वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हातघाईवर आले. दोघांमध्ये चांगलीच जुंपली. दोघांनी एकमेकांना ठोसे लगावले, पाडले, आपटले. दोघेही रक्तबंबाळ झाले. शेवटी शनिमहाराजांनी माघार घेतली. 'मी तुझ्या वाटेला गेलो, माझे चुकले. पुन्हा असे करणार नाही' असे शनिमहाराज हात जोडून म्हणाले. मारुतीरायांनी त्यांना बजावले यापुढे माझी उपासना करणाऱ्यांच्या वाटेला जाऊ नकोस. माझे आराध्य दैवत मार्तंडवंशावतंस उपासना करणाऱ्यांच्या वाटेला जाऊ नकोस. माझे आराध्य दैवत मार्तंडवंशावतंस प्रभुरामचंद्र यांच्या भक्तांना उपद्रव देऊ नकोस. शनिमहाराजांनी ते मान्य केले. 8 शनी हा यमाचा धाकटा भाऊ. पण दोघांमध्ये जमिन अस्मानाचा फरक. धर्म्यवृत्तीला यमधर्म म्हणतात. तिमिरवृत्तीला शनि म्हणतात. शनि शिक्षा करतो. यम न्याय देतो. सूर्यनमस्कार एक साधना २२