पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दक्षिणमुख, पश्चिममुख, उत्तरमुख, मस्तक. तक्ता क्र. एकोणीस सूर्यनमस्काराचे अधिष्ठान सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम प्रकार आहे. धार्मिकदृष्ट्या तो नित्यकर्माचा एक भाग आहे, विधी आहे. प्रत्येक धार्मिक विधीला, तसे पाहिले तर प्रत्येक क्रियेला, काहीतरी अधिष्ठान असते. अधिष्ठान म्हणजे त्या विधीचे मूलतत्त्व, मूळ आधार किंवा कीलकं. धार्मिक विधीचा मुख्य भाग सुरू करण्यापूर्वी या कीलकं चा उच्चार करायचा. हा सपूर्ण विधी करतांना या मूळ संकल्पनेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा, त्याचा विस्तार करायचा, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा. - श्रीरामरक्षा रामरक्षेचा पाठ म्हणतांना सुरुवातीला आपण म्हणतो सीताशक्ती श्रीमद्हनुमान कीलकं । 7 आदिशक्तीचे अधिष्ठान (आणि प्रभूरामचंद्रांचा वरदहस्त) असलेल्या वीर हनुमानाच्या पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे श्रीरामरक्षा स्तोत्र. - - श्रीमद्भगवद्गीता वाचतांना सुरुवातीला आपण म्हणतो अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः इति कीलकं । मा शुच: या शब्दांचा अर्थ आहे काळजी शोक करू नकोस. मनात संशय धरू नकोस. भगवान श्रीकृष्ण आपल्याला आश्वासन देत आहेत की जे कोणी श्रीमद्भगवद्गीता वाचतात / जगतात त्यांना केलेया सर्व पाप-दुख यांच्यापासून मुक्ती मिळते. ग्रंथराज दासबोध वाचतांना सुरूवातीला आपण म्हणतो स्वधामासि जाता महारामराजा । हनुमंत तो ठेविला याचि काजा। सदासर्वदा रामदासासि पावे। खळी गांजिता ध्यान सांडोनि धावे ।। हनुमंत, वज्रहनुमान मारूती हा वायुपुत्र. वायू या शब्दाला पर्यायी शब्द 7 'अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, अस बर दीन जानकी माता।। (श्रीहनुमान चालीसा) सूर्यनमस्कार एक साधना २१