पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गृहिततत्त्वे खालीलप्रमाणे सांगता येतील. सूर्यनमस्काराची गृहित तत्त्वे तक्ता क्र. सोळा, सतरा सूर्यनमस्कार • स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य याची पूजा आहे. अकाल मृत्यू, रोग, व्याधी, व्यसन यापासून मुक्ती देणारा आहे. साधनेतून मानसिक व शारीरिक सर्व रोगव्याधिंना संपूर्णपणे प्रतिबंध घालता येतो. प्राथमिक स्वरुपातील विकार असल्यास सूर्यनमस्काराचा सराव उपचार म्हणून करता येतो. • शरीरामधील ९५% ते ९७% स्नायूंची कार्यक्षमता वाढवितो. वात-कफ-पित्त हे त्रिदोष सम स्थितीमध्ये ठेवतो. र - मन-बुद्धि (प्रज्ञा ) या तिन्ही स्तरावर सारख्याच प्रमाणात प्रभाव टाकतो. शरीर-म . ● ● सूर्योपासनेचा समावेश सर्वच धर्मामध्ये केलेला आढळतो. • जगातील सर्वलोक सूर्योपासक आहेत. सूर्योपासना हा जगातील प्रत्येक व्यक्तीचा वारसा हक्क आहे. वैश्विक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य आणि आनंद सवंर्धन करण्यासाठी हिंदु वैदिक संस्कृतिने जगाला दिलेली ही अलौकिक, अनमोल देणगी आहे. ही साधना अतिपुरातन कालापासून चालत आलेली आहे. ● • - ● यामध्ये प्रत्येक सूर्यनमस्कार साधकाला आलेले अनुभव लिहिले तर ही यादी बरीच मोठी होईल. तुम्हालाही सूर्यनमस्काराचे इतर अनेक गृहित तत्त्वे माहिती आहेत. या सैद्धांतिक माहितीला प्रत्यक्ष सरावाचा आधार नसेल तर ते फक्त पुस्तकी ज्ञान होते. पुस्तके ज्ञान साठवितात म्हणून ते ज्ञानी होत नाहीत. कारण त्यांना या ज्ञानाची अनुभूती घेता येत नाही. हे सैद्धांतिक ज्ञान नित्य सूर्यनमस्कार एक साधना १८